समुद्राच्या पाण्याने श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा चरणस्पर्श करणे
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ त्यांचा दैवी दौरा करत असतांना ‘त्या साक्षात् अवतार कशा आहेत ?’, हे त्यांच्या वेगवेगळ्या कृतींतून पंचमहाभूते दाखवत असतात.
डिसेंबर २०२२ मध्ये आम्ही महर्षींनी सांगितल्यानुसार गणपतीपुळे (जिल्हा रत्नागिरी) येथे गणपतीला अभिषेक करण्यास गेलो होतो. आम्ही गणपतीचे दर्शन घेऊन आणि त्याला अभिषेक करून सायंकाळी तेथील समुद्रकिनार्यावर गेलो. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ समुद्रकिनार्यावर एका लहान स्टुलावर नामजप करत बसल्या होत्या. नामजप झाल्यानंतर त्या समुद्रदेवतेला प्रार्थना करत समुद्राकडे पहात होत्या. त्या वेळी समुद्राचे पाणी त्यांच्या २ – ३ फूट जवळ यायचे आणि परत जायचे. जोपर्यंत त्या बसल्या होत्या, तोपर्यंत असे घडत होते. आश्चर्य म्हणजे त्या जेव्हा उठून उभ्या राहिल्या तेव्हा एका क्षणात समुद्राच्या पाण्याने त्यांच्या चरणांना स्पर्श केला. त्यानंतर ते पाणी त्यांच्यापासून ५ – ६ फूट मागे गेले. आम्ही सर्व जण हे दैवी दृश्य पहात होतो. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ छोट्या स्टुलावर बसल्या होत्या. त्या वेळी त्यांची साडी वाळूला टेकली होती. जर त्या वेळी पाणी त्यांच्याकडे आले असते, तर साडी भिजली असती आणि रेती लागून खराब झाली असती. हे समुद्र नारायणाच्या लक्षात होते आणि त्यामुळे ते पुढे येत नव्हते. साक्षात् समुद्र नारायण महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ उठण्याची वाट पहात होते. ‘त्या कधी उठतात आणि त्यांचे चरणस्पर्श करू ?’, असे ‘त्यांना वाटत असेल’, असे मला वाटले, तसेच ‘आपल्या स्पर्शाने कुणाला काही त्रास होणार नाही’, याचीही काळजी समुद्र नारायणाने घेतली.’
– श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई (३०.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |