गोवा : ध्वनीप्रदूषणावरून मांद्रे येथे स्थानिकांनी ‘पार्टी’ बंद पाडली !
पेडणे, २१ डिसेंबर (वार्ता.) : आस्कावाडा, मांद्रे येथे १९ डिसेंबरच्या रात्री मोठ्या आवाजात चालू असलेली पार्टी स्थानिकांनी बंद पाडली. प्रारंभी स्थानिकांनी या पार्टीच्या विरोधात तक्रार नोंदवली; मात्र कायद्याचे उल्लंघन होऊनही पार्टीचे आयोजन करणार्यांना सरकारी यंत्रणेची कोणतीही भीती नसल्याने स्थानिकांनी ही पार्टी बंद पाडली.
स्थानिकांच्या मते मोरजी आणि मांद्रे समुद्रकिनारा कासवसंवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करूनही या भागांत अवैधरित्या मोठ्या आवाजात संगीत पार्ट्या चालूच आहेत. यासंबंधी पोलीस आणि उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवल्यानंतर आता अल्प आवाजात पार्ट्या चालू आहेत. यामुळे लोकांचा त्रास उणावला असला, तरी कायद्याचे उल्लंघन चालूच आहे. मोरजी आणि मांद्रे भागांतील समुद्रकिनार्यांवर रात्री मोठ्या आवाजात संगीत रजनीचे आयोजन करण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. न्यायालयाने ध्वनीप्रदूषणासंबंधी कडक निर्बंध लादले असतांना पार्ट्यामधून ध्वनीप्रदूषण चालूच आहे. १७ डिसेंबर या दिवशी रात्री मोरजी आणि जुनसवाडा येथील नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्यानंतर हरमल पोलिसांनी दीड घंटा उशिरा घटनास्थळी पोचून तेथील पार्टी बंदी पाडली.
संपादकीय भूमिका
|