अमली पदार्थ विकणारा नायजेरियन अटकेत
ठाणे – नालासोपारा येथे रहाणार्या एका नायजेरियन नागरिकास येथे अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ३१ ग्रॅम वजनाची कोकेन पावडर जप्त करण्यात आली. त्याची किंमत १२ लाख ४० सहस्र इतकी आहे. नाताळ सुट्टी आणि नववर्ष स्वागतानिमित्त आयोजित मेजवानीकरता अमली पदार्थ विकण्यासाठी तो आला होता.
तो ठाणे शहरातील आनंदनगर चेकनाका सेवा रस्त्याजवळ कोकेन विकण्यासाठी येत होता. भ्रमणभाष, नायजेरीया देशाचा पासपोर्ट आणि विसा त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.