लोकहो, आमदारांना किती सुविधा मिळतात ? समजून घ्या !
आमदार म्हणून निवडून आल्यावर आणि त्यातही मंत्री झालेल्या लोकप्रतिनिधींच्या संपत्तीमध्ये ५ वर्षांत किती वाढ होते, हे आपणाला दिसून येते. लोकशाहीत ‘जनतेचे सेवक’ असलेल्या लोकप्रतिनिधींना सरकारच्या तिजोरीतून किती सुविधा मिळतात ? हे जनतेलाही कळावे, यासाठी ही माहिती देत आहोत. यावरून लोकप्रतिनिधींना निवडून देणार्या आणि लोकशाहीत ‘मालक’ असलेल्या जनतेला त्या तुलनेत किती सुविधा मिळतात ? हेही लक्षात येईल.
१. सरकारच्या तिजोरीतून आमदारांना मिळणार्या सुविधा !
(टीप : विधानसभा आणि विधान परिषद यांतील आमदारांना मिळणार्या या सर्व सुविधा ७ व्या वेतन आयोगानुसार िमळत आहेत.)
२. …यावर सरकार आणि प्रशासन विचार करणार का ?
या सर्व सुविधा लोकप्रतिनिधींना द्याव्यात कि नाही ? किंवा दिल्या, तर किती प्रमाणात द्याव्यात ? हे सरकारने ठरवायला हवे; परंतु या सुविधा ‘जनतेचे सेवक’ म्हणून दिल्या जातात, हे सरकार आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्षात ठेवायला हवे. भ्रष्टाचार न करता जनतेची सेवा प्रामाणिकपणे करणार्या लोकप्रतिनिधींना या सुविधांचा उपयोग निश्चितच होईल; परंतु आमदारकीच्या काळात लोकप्रतिनिधी कोट्यधीश होत असतील, तर त्यांना जनतेच्या करातून या सेवा देणे, म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय होय ! यावर कधीतरी विचार होणे आवश्यक आहे.
– श्री. प्रीतम नाचणकर, नागपूर (२०.१२.२०२३)