चोरी झालेले २ कोटी रुपयांचे साहित्य मूळ मालकांकडे सुपुर्द !
पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गहाळ आणि चोरी झालेले १२५ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील २ कोटी रुपयांचे साहित्य मूळ मालकांना परत केले आहे. यामध्ये २१ लाख रुपयांचे ४८ तोळे सोन्याचे दागिने, २५ लाख रुपयांच्या २ अलिशान चारचाकी, ८ लाख रुपयांच्या २२ दुचाकी, १४ लाख ८८ सहस्र रुपयांचे वेगवेगळ्या आस्थापनांचे ६९ भ्रमणभाष संच, भ्रमणसंगणक आदींचा समावेश आहे. पोलीस आयुक्तांच्या हस्ते मूळ मालकांना मुद्देमाल परत करण्यात आला.