रामराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती
शिवतीर्थ, जळगाव या ठिकाणी २४ डिसेंबर या दिवशी होणार हिंदु संघटनशक्तीचा आविष्कार !
जळगाव – भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय-आयोग नाही. मुसलमान आणि ख्रिस्ती यांना धार्मिक शिक्षण देणार्या शाळांना सरकारी अनुदान, तर हिंदूंना भगवत्गीतेसह धार्मिक शिक्षण देण्यावरच आक्षेप आहे. देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी-चर्च यांचे सरकारीकरण का नाही ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ? ‘लव्ह जिहाद’,‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच श्रीराम मंदिराच्या साक्षीने हिंदु राष्ट्र अर्थात् रामराज्याचा दिशेने वाटचाल चालू करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २४ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता शिवतीर्थ, कोर्ट चौक येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सभास्थळी वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन लागणार ! – सद्गुरु नंदकुमार जाधव
या सभेच्या ठिकाणी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाच्या संदर्भात माहिती देणारे फलक, क्रांतीकारकांविषयी माहिती देणारे फलक, काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचे फलक; यांसह हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक विविध अनमोल ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.
११ तालुक्यांत १५० हून अधिक गावात प्रसार ! – अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले
सभेसाठी ११ तालुक्यांतील अनेक गावात प्रत्यक्ष प्रसार करण्यात आला असून गेले मासभर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. भित्तीपत्रके, हस्तपत्रके, होर्डिंग, फलकलेखन, रिक्शा, उद्घोषणा, सामाजिक संकेतस्थळे यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे.
सभेनिमित्त २२ डिसेंबरला सकाळी १० वाजता वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.