वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर यांच्या लेखातील चौकटीनुसार प्रयोग केल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती
वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर यांच्या लेखाच्या शेवटी मी माझे पुढील विचार छापायला सांगितले होते. ‘ते किती योग्य होते,’ याची जाणीव या लेखात दिलेल्या साधकांच्या अनुभूतीवरून होईल.
‘एखाद्या व्यक्तीने थोडी जरी मदत केली, तरी आपण तिचे आभार मानतो. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनात कितीतरी वस्तू आपल्याला मदत करतात; म्हणून त्यांचेही आभार मानले पाहिजेत’, हे वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर यांच्या लेखामुळे लक्षात आले. त्याबद्दल त्यांचेही आभार !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले |
माहितीसाठी सांगितलेला प्रयोगपुढील २ सूत्रे प्रत्येकी तीन वेळा वाचा आणि तेव्हा ‘काय अनुभूती येते ?’, हे अनुभवा. सूत्र १. ‘हे देवा, तुम्ही या जिवाला सर्वच वस्तूंचे महत्त्व लक्षात आणून देऊन त्यांच्यातील भाव अनुभवण्याची संधी दिली आणि ही सुंदर अनुभूती देऊन त्यातून पुष्कळ आनंदही दिला’, त्याबद्दल आपल्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्याणकर सूत्र २. ‘एखाद्या व्यक्तीने थोडे जरी साहाय्य केले, तरी आपण तिचे आभार मानतो. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनात कितीतरी वस्तू आपल्याला साहाय्य करतात; म्हणून त्यांचेही आभार मानले पाहिजेत’, हे वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर यांच्या लेखामुळे लक्षात आले. त्याबद्दल त्यांचेही आभार !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले |
६.३.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पृष्ठ क्र. ७ वर प्रसिद्ध झालेल्या ‘रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर यांना सुचलेल्या प्रार्थना आणि त्यांनी अनुभवलेला आनंद !’ या लेखातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी करण्यास सांगितलेला बुद्धीअगम्य प्रयोग करतांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. श्री. गणेश कामत, शिवमोग्गा, कर्नाटक.
‘चौकटीत दिल्याप्रमाणे मी दोन्ही सूत्रे प्रत्येकी तीन वेळा वाचली. गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) सूत्र वाचायला आरंभ केला. तेव्हा पहिल्यांदा वाचल्यावर माझा भाव जागृत झाला. दुसर्यांदा वाचल्यावर अनाहतचक्रामध्ये कृतज्ञतेचा भाव जागृत झाला. तिसर्यांदा वाचल्यावर सूत्राचा शब्दार्थ कळला आणि ‘कृतज्ञताभाव’ हा शब्द मनात आला.’
२. सौ. संगीता देव, प्राधिकरण, पुणे.
२ अ. सूत्र क्रमांक १ (साधिकेने देवाला केलेली प्रार्थना) : ‘विश्वातील प्रत्येक सजीव किंवा निर्जीव वस्तू, तसेच सर्व साधक हे गुरुमाऊलीचेच रूप आहेत. आपल्याला दैनंदिन जीवनात साहाय्य करणार्या प्रत्येक वस्तूतील गुरुमाऊलीचे विश्वस्वरूप जाणून मोनिकाताईंनी त्यांच्याप्रती पूर्ण शरणागतभावाने व्यक्त केलेली कृतज्ञता वाचून त्यांच्याप्रती, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती कृतज्ञता वाटली.
२ आ. सूत्र क्रमांक २ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधिकेचे मानलेले आभार) : या सूत्रामध्ये गुरुमाऊलीने मोनिकाताईंचे आभार मानून अतिशय सहजपणे प्रत्येक वस्तूचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनात अध्यात्म जगण्यासाठी करायची कृती सोपी करून सांगितली. अशा ब्रह्मांडस्वरूप व्यापक गुरुमाऊलीमुळेच आम्हा साधकांचे अस्तित्व आहे. त्यासाठी गुरुमाऊलीप्रती कृतज्ञता !
३. श्री. सागर जोशी, चिंचवड, पुणे.
३ अ. सूत्र क्रमांक १ (साधिकेने देवाला केलेली प्रार्थना) : ‘पहिले सूत्र ३ वेळा वाचले; पण मला काही जाणवले नाही.
३ आ. सूत्र क्रमांक २ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधिकेचे मानलेले आभार) : हे सूत्र वाचता क्षणी अकस्मात् माझे मन निर्विचार झाले आणि मला पुष्कळ हलकेपणा जाणवला.’
४. श्री. राज कर्वे, फोंडा, गोवा.
४ अ. सूत्र क्रमांक १ (साधिकेने देवाला केलेली प्रार्थना): ‘कु. मोनिका यांनी लिहिलेल्या सूत्रात कृतज्ञताभाव जाणवतो. तो व्यक्त स्तरावरील असल्यामुळे आनंद जाणवला.
४ आ. सूत्र क्रमांक २ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधिकेचे मानलेले आभार) : या सूत्रात व्यक्त स्तरावरील भाव जाणवला नाही. अव्यक्त भाव जाणवला. शांत वाटले.’
(वरील सर्व सूत्रांचा दिनांक ६.३.२०२३)
५. सौ. सुजाता अरविंद कल्याणकर (वैद्या (कु.) मोनिका यांची आई), बारामती, पुणे.
अ. ‘या सूत्रांमधून ‘आपल्याला या सर्व गोष्टी ज्ञात असूनही आपण वर वर प्रार्थना करतो; पण मोनिकाने त्या वस्तूंमध्ये किंवा त्या वस्तूंच्या ठिकाणी स्वतःला ठेवून, त्या वस्तूंतील गुण पाहून ‘तशी कृती करत आहे’, असा भाव ठेवला. त्यामुळे सर्वांनाच आनंद मिळाला’, असे माझ्या लक्षात आले.
आ. ही सूत्रे वाचत असतांना मला ‘मी त्या भावस्थितीतच आहे’, असे वाटत होते.
इ. ‘सजीव-निर्जीव वस्तूंच्या ठिकाणी मी स्वतः आहे’, असे मला वाटले.
ई . ‘दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट किंवा वस्तू किती महत्त्वाची आहे ? त्यांच्याप्रती कसा कृतज्ञताभाव असायला हवा ? कशी शरणागती असायला हवी ?’, हे मला शिकायला मिळाले.
उ. ‘सातत्याने भावावस्थेत रहायला हवे’, हे लक्षात आले.’
६. श्री. अरविंद कल्याणकर (वैद्या (कु.) मोनिका यांचे वडील), बारामती, पुणे.
अ. ‘प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वर आहे आणि तसे पाहिल्यास तो अनुभवता येतो’, असे जाणवले.
आ. श्री संत ज्ञानेश्वर माऊली श्री चांगदेव महाराज यांना भेटायला जातात. त्या वेळी श्री चांगदेव महाराज वाघावर बसून येत असतात. तेव्हा मुक्ताबाई विचारते, ‘दादा, आपण कसे जायचे ?’ त्या वेळी ते भिंतीवर बसले होते. तिला माऊली म्हणतात, ‘‘आपण या भिंतीवरूनच जाऊ.’’ तेव्हा भिंत चालू लागते. यातून निर्जीव वस्तूंमध्येही ईश्वर आहे’, हे लक्षात येते. येथे ‘तसाच भाव वैद्या (कु.) मोनिका यांचा आहे’, असे जाणवले.
इ. या लेखात जी गुणवैशिष्ट्ये सांगितली आहेत, ती पुष्कळ समर्पक आहेत. कृतज्ञता !’
(वरील सूत्रांचा दिनांक ७.३.२०२३)
७. वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्याणकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
७ अ. सूत्र क्रमांक १ (साधिकेने देवाला केलेली प्रार्थना )
१. ‘हे सूत्र प्रथम वाचतांना मनामध्ये एक आर्त कृतज्ञताभाव निर्माण झाला. जो उत्तरोत्तर, म्हणजे दुसर्यांदा आणि तिसर्यांदा हेच सूत्र वाचत असतांना वृद्धींगत होत गेला.
२. मनातील भाव-भक्ती देवाच्या चरणांपर्यंत पोचत असून त्याचे एक निराळेच समाधान, शांती आणि स्थिरता मनाला अनुभवता येत होती.
३. स्वतःचे अस्तित्व विसरल्यासारखे झाले.
४. येथे स्वतःला ‘एक जीव’ असे संबोधल्याने ‘ही कृतज्ञता सगुणपेक्षा निर्गुण स्तरावरील अधिक आहे आणि व्यापकत्व निर्माण करणारी आहे’, असे वाटून भगवंताची व्यापकता अनुभवता आली.
५. यामध्ये सर्व वस्तूंमधील, म्हणजे सजीव-निर्जीव अशा चराचर सृष्टीतील भाव अनुभवता आला. ‘भाव तिथे देव’ याप्रमाणे ‘ईश्वराचे अस्तित्व सर्वत्र आहे’, अशी सुंदर अनुभूती आली.
६. यामुळे सर्वाेच्च आनंद अनुभवता आला.
७. अन्य सर्व विचार थांबून केवळ कृतज्ञताभाव जागृत झाला. प्रदीर्घ काळ त्या भावस्थितीमध्ये रहाता आले. ‘त्या आनंदमय अवस्थेतून कधीच बाहेर न पडता श्री गुरूंच्या चरणसेवेशी एकरूप व्हावे’, असे वाटले.
७ आ. सूत्र क्रमांक २ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधिकेचे मानलेले आभार)
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे स्वतः अध्यात्मातील अत्युच्च स्थानी असूनही त्यांची जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती, त्यासह ‘अन्य सर्वांनाही ते शिकता यावे’, यासाठीची त्यांची तळमळ अनुभवता आली.
२. ‘परात्पर गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) एका अनुभूतीतूनही कितीतरी शिकवतात आणि कृतीच्या स्तरावर असे बुद्धीअगम्य प्रयोग करून घेऊन त्यांचे शास्त्र समजावून सांगतात’, हे प्रत्यक्ष या लेखाच्या माध्यमातून अनुभवता आले.
३. ‘एखाद्या व्यक्तीने थोडे जरी साहाय्य केले, तरी आपण तिचे आभार मानतो. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनात कितीतरी वस्तू आपल्याला साहाय्य करतात; म्हणून त्यांचेही आभार मानले पाहिजेत’, याचे महत्त्व पटून ती जाणीव अंतर्मनापर्यंत पोचली.
४. ‘कुणाचेही ‘आभार मानणे’, ही केवळ एक वरवरची साधारण कृती नसावी, तर शुद्ध अंतःकरणापासून व्यक्त होणारा तो निर्मळ कृतज्ञताभाव असावा. तेव्हाच त्यातून साधना होईल’, याची जाणीव झाली.
५. या अनुभूतीतून पुष्कळ प्रेरणा, उत्साह आणि ऊर्जा मिळून कृतीच्या स्तरावर बुद्धीअगम्य प्रयोग केल्याने सकारात्मकता वाढली अन् पुष्कळ शिकता आले.
६. ‘प.पू. गुरुदेव एका लहानशा कृतीचे किती कौतुक करून त्यातून सर्वांना घडवून शिकण्यातील आनंद देतात’, हे लक्षात आले. ‘सर्वांप्रती एक निश्चल भाव, म्हणजेच कृतज्ञताभाव कसा असावा ?’, हे शिकायला मिळाले.
७. ‘देवाला ‘भाव’ पुष्कळ प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला देवापर्यंत पोचायचे, तर ‘भाव’च पोचवणार आहे’, हे यातून कळले. ‘साधनेमध्ये भावजागृतीसाठी करावयाच्या प्रयत्नांना सर्वाधिक महत्त्व का आहे ?’, हे पटले.
प्रार्थना
‘हे विष्णुस्वरूप गुरुदेवा, तुम्हीच यासाठीचे सर्व प्रयत्न आम्हा सर्वांकडून अखंड करून घ्या, हीच आपल्या सुकोमल चरणी कोटीशः प्रार्थना !
कृतज्ञता
हा बुद्धीअगम्य प्रयोग तुम्हीच करून घेतला आणि अनेक अनुभूती अनुभवण्यास देऊन त्या लिहून घेतल्या, याविषयी आपल्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता !’ (८.३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |