DMK Corruption : तमिळनाडूचे विद्यमान शिक्षणमंत्री तथा द्रमुकचे नेते पोनमुडी आणि त्यांची पत्नी यांना ३ वर्षांचा कारावास !
|
(द्रमुक म्हणजे द्रविड मुनेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ)
चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडूचे उच्च शिक्षणमंत्री तथा द्रमुक पक्षाचे नेते के. पोनमुडी आणि त्यांची पत्नी पी. विशालाक्षी यांना बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणी ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासह या दोघांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा दंडही ठोठावला. पोनमुडी यांच्याकडे सध्या उच्च शिक्षण विभागाचा कार्यभार असल्याने न्यायालयाने त्यांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाने पोनमुडी यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती. आता पोनमुडी सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही, तर पोनमुडी यांना आमदारकी आणि मंत्रीपद गमवावे लागेल.
सौजन्य : न्यूज 9 लाईव
१. पोनमुडी यांच्यावरील आरोप भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(२)(१)(ई) अन्वये दंडनीय गुन्ह्यांच्या संदर्भात सिद्ध झाले आहेत. अशी कलमे लोकसेवकाद्वारे केलेले गुन्हेगारी गैरवर्तन आणि बेकायदेशीर कमाई यांच्याशी संबंधित आहेत.
२. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, विशालाक्षी यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०९ (भडकावणे) सह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या समान कलमांतर्गत आरोप सिद्ध झाले आहेत.
संपादकीय भुमिका
सनातन धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करणारे द्रमुकचे नेते आणि मंत्री किती भ्रष्टाचारी आहेत, हे जाणा ! |