पू. परांजपेआजोबा यांचा आशीर्वाद सदैव लाभावा ।

मार्गशीर्ष शुक्ल नवमी (२१.१२.२०२३) या दिवशी सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपे यांचा ८१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाने त्यांच्या चरणी वाहिलेले काव्यरूपी कृतज्ञतापुष्प येथे दिले आहे.

पू. सदाशिव परांजपे

पू. सदाशिव परांजपे यांच्या चरणी ८१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

श्री. अविनाश जाधव

साधी राहणी अन् मितभाषी ।
असे आम्हा सर्वांचे पू. परांजपेआजोबा (टीप १) ।। १ ।।

नामजपादी उपाय अन् टंकलेखन या सेवा करूनी ।
सेवारत रहातात सदैव गुरुचरणी ।। २ ।।

उतारवयातही मायेतील सर्व पाश तोडले ।
स्वतःला श्री गुरुचरणी समर्पित केले ।। ३ ।।

श्रीचित्‌शक्ति (टीप २) यांना जन्म देऊन ।
घोर कलियुगात आम्हा
साधक-भक्तांचे कल्याण केले ।। ४ ।।

रामनाथी आश्रमासाठी तुम्ही जणू आहात पिता ।
तुमचा आधार वाटतो आम्हा साधकजना ।। ५ ।।

पू. परांजपेआजोबा यांचा आशीर्वाद सदैव लाभावा ।
अशी प्रार्थना, आम्हा सर्व साधकांची श्री गुरुचरणी ।। ६ ।।

टीप १ : सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपेआजोबा

टीप २ : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ पू. परांजपेआजोबा यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत आणि त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत.

– श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१२.२०२३)