Maa Shyama Temple : दरभंगा (बिहार) येथील मां श्याम मंदिरामधील बळी देण्यावर घालण्यात आलेली बंदी न्यास समितीकडून मागे !
बंदीच्या विरोधात भाविकांनी केले होते आंदोलन
दरभंगा (बिहार) – येथील प्रसिद्ध मां श्याम मंदिरमध्ये बळी देण्याच्या प्रथेवर घालण्यात आलली बंदी मागे घेण्यात आली आहे. बिहार राज्य धार्मिक न्यास समितीने ही बंदी घातली होती. त्यानंतर याला भाविकांकडून प्रखर विरोध करण्यात येत होता. त्यामुळेच या समितीने माघार घेत ही बंदी हटवली आहे. या संदर्भात न्यास समितीचे अध्यक्ष सुरेंद्र मोहन झा यांनी म्हटले आहे की, बळी प्रथेचे आम्ही विरोध किंवा समर्थन करत नाही. बळी प्रथेमध्ये मंदिर प्रशासनाची कोणतीही भूमिका नही. वैयक्तिक व्यवस्था करून लोक मंदिर परिसरात बळी देऊ शकतात.
१. जिल्हाधिकार्यांसमवेत बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. न्यास समिती मंदिर परिसरात बळी देण्याच्या संदर्भातील काही नियमांमध्ये पालट करणार आहे. समिती शांततेत बळी देण्याच्या प्रथेला पुढे नेण्यासाठी काम करणार आहे. बळीसाठी आता पैसे घेतले जाणार नाहीत. उलट मंदिर प्रशासन साहाय्य करील. बळी देणार्यांनी त्यांच्या लोकांसमवेत यावे आणि तेथे बळी द्यावा.
२. दुसरीकडे बंदी हटवण्यात आल्यामुळे काही संघटना याचा विरोध करू लागल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, तंत्र विधीसाठी मंदिराच्या परिसरात बळी दिला जात आहे. याच्या विरोधासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.