Bihar SI Murder : बेगूसराय (बिहार) येथे दारू माफियांनी पोलीस उपनिरीक्षकाला गाडीखाली चिरडून ठार मारले !
गृहरक्षक दलाचा सैनिक घायाळ
बेगूसराय (बिहार) – येथे दारू माफियांनी एका पोलीस उपनिरीक्षकाला चारचाकी गाडीच्या खाली चिरडून ठार मारले. यात गृहरक्षक दलाचा बालेश्वर यादव हा सैनिकही घायाळ झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. खामस चौधरी असे मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ते १९ डिसेंबरच्या रात्री दारू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेले असता ही घटना घडली. बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्यात आलेली आहे.
नावकोठी थाना में प्रतिनियुक्त पु०अ०नि० खामस चौधरी की शराब की सूचना के बाद सत्यापन के क्रम में आल्टो कार के टक्कर मारे जाने से कर्तव्य के दौरान शहीद हो गए।@bihar_police #begusaraipolice #BiharPolice pic.twitter.com/odMGKwCYx1
— BegusaraiPolice (@BegusaraiPolice) December 20, 2023
संपादकीय भूमिकाबिहारमध्ये जंगलराज ! दारूबंदी असणार्या राज्यात दारू माफिया कार्यरत असून ते पोलिसांना ठार मारतात, हे राज्यातील जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या युती सरकारला लज्जास्पद आहे ! याविषयी जनतेने सरकारला जाब विचारणे आवश्यक आहे ! |