अंतिम आठवडा चर्चेला ‘वांझोटी चर्चा’ संबोधून विरोधकांनी चर्चा थांबवली !
नागूपर, २० डिसेंबर (वार्ता.) – महत्त्वाच्या समजल्या जाणार्या अंतिम आठवडा चर्चेला १९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत मंत्री उपस्थित नसल्यामुळे विरोधी पक्षातील नाना पटोले यांनी ‘वांझोटी चर्चा’ संबोधून भाषण थांबले. या वेळी तालिका सभापती समीर कुणावले यांच्या हस्तक्षेपावरून विरोधकांनी चर्चेला पुन्हा प्रारंभ केला.
विरोधी पक्षाच्या वतीने काँग्रेसचे आमदार नाना पटोले चर्चेला प्रारंभ केला. या वेळी सभागृहात केवळ मंत्री संदीपान भुमरे हे उपस्थित होते. विधीमंडळाचे कामकाज संस्थगित होण्याच्या आदल्या दिवशी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था या महत्त्वाच्या सूत्रावर सभागृहात चर्चा होते. यामध्ये विरोधकांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची समजली जाते; मात्र या चर्चेला अन्य मंत्री आणि विरोधी पक्षाचे सदस्यही अत्यल्प होते.