Gyanvapi : (म्हणे) ‘बाबरीविषयी संयम बाळगला, ज्ञानवापीसाठी रस्त्यावर उतरू !’ – मौलाना तौकीर रझा
मौलाना तौकीर रझा यांचे चिथावणीखोर वक्तव्य !
(मौलाना म्हणजे इस्लामी अभ्यासक)
देहली – ‘बाबरी मशिदीविषयी आम्ही संयम बाळगला होता; मात्र ज्ञानवापीविषयी चालू असलेल्या षड्यंत्राच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून लढा देऊ’, असे चिथावणीखोर वक्तव्य ‘इत्तेहाद-ए-मिल्लत काऊन्सिल’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना तौकीर रझा यांनी केले. ते देहलीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ‘आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत, आम्हाला आमचा वाटा हवा आहे’, असेही मौलाना रझा यांनी सांगितले.
सौजन्य : TIMES NOW Navbharat
मौलाना रझा पुढे म्हणाले की, इंग्रजांनी ‘फूट पाडा आणि राज्य करा’ हे धोरण अवलंबून देशावर राज्य केले. आज देशात ‘काळे इंग्रज’ राज्य करत आहेत. सध्या देशात कायदा संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. (न्यायालयाच्या निर्णयाला न जुमानता रस्त्यावर उतरून लढा देण्याचे चिथावणीखोर वक्तव्य करून देशातील कायदा कोण नष्ट करू पहात आहे ?, हे जनतेला दिसत आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदुनिष्ठांविरुद्ध कथित द्वेषयुक्त भाषण (हेट स्पीच) केल्याच्या प्रकरणी उठसूठ गुन्हा नोंदवणार्या पोलिसांना आता मौलाना तौकीर रझा यांचे हे वक्तव्य द्वेषयुक्त वाटत नाही का ? |