‘विकार निर्मूलनासाठी नामजप’ या सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथात दिलेला नामजप केल्यावर अंगावरील गाठ नष्ट होणे
१. बरीच औषधे घेऊनही बरी न झालेली गाठ मधुमेहामुळे शस्त्रकर्म करून काढण्याची सिद्धता नसणे : ‘३ – ४ वर्षांपासून माझ्या पाठीवर बोराच्या आकाराची गाठ होती. बरीच औषधे घेऊनही ती बरी होत नव्हती. माझे मामा आधुनिक वैद्य आहेत. मी त्यांना याविषयी सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘शस्त्रकर्म करून गाठ काढून टाकू.’’ मला मधुमेह असल्यामुळे शस्त्रकर्म करण्याची माझ्या मनाची सिद्धता नव्हती.
२. सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथात दिल्यानुसार ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचे उपाय करणे : सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘विकार निर्मूलनासाठी नामजप – भाग २’ या ग्रंथात गाठीवर उपायांसाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप दिला असल्याचे माझ्या लक्षात आले. मी अंघोळीनंतर एका काचेच्या कपात पाणी घेऊन हाताची पाचही बोटे बुडवून २१ वेळा नामजप करून, भारित झालेले पाणी प्राशन करणे आरंभ केले. मी ते पाणी गाठीवरही लावत असे, तसेच मी प्रतिदिन अर्धा घंटा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजपही करत असे.
३. उपाय करू लागल्यानंतर एक वर्षाने गाठ आपोआप फुटून तिची जखम बरी होणे : नामजपाला आरंभ केल्यानंतर एक वर्षाने ती गाठ आपोआप फुटली आणि तिच्यातून पू निघाला. २ – ३ दिवसांत ती जखम पूर्णपणे बरी झाली. तेव्हा ‘श्री गुरूंनी लिहिलेला सनातनचा एक एक ग्रंथ किती अनमोल आहे ?’, याची मला जाणीव झाली. गुरुदेवांच्याच कृपेने त्रास दूर झाल्याबद्दल मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. मधुरा मिलिंद सराफ, यवतमाळ. (१५.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |