वैद्यकीय क्षेत्रात आध्यात्मिकतेवर आधारित ज्ञानाचा आधार घेऊन भारत नेतृत्व करील ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
मिरज – कोरोना महामारीच्या काळात झालेल्या विविध घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्रात तणाव वाढत आहे, तसेच यामुळे विज्ञानाच्या मर्यादाही लक्षात येत आहेत. या तणावातून बाहेर पडण्यासाठी ताणाचे मूळ कारण सोधून त्यावर उपाययोजना काढून त्याला नामजपाची जोड दिल्यास आपण तणावमुक्त होऊ शकतो. हाच भाग आधुनिक वैद्य रुग्णांवर उपचार करतांना लक्षात ठेवून त्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करू शकतात. प्राचीन काळात या सर्व उपचारपद्धती भारतात विकसित होत्या. यापुढील काळात वैद्यकीय क्षेत्रात आध्यात्मिकतेवर आधारित ज्ञानाचा आधार घेऊन भारत नेतृत्व करील, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. मिरजेतील दत्त मंगल कार्यालयामध्ये आधुनिक वैद्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.
याप्रसंगी काही आधुनिक वैद्यांनी ‘नामजप केल्यावर त्यांना काय लाभ झाले’, ते सांगितले. एका वैद्यांनी ‘त्यांना ताप आलेला असतांना श्री विठ्ठलाची आरती केल्यावर घाम येऊन ताप गेला’, अशीही अनुभूती सांगितली.