MP Suspended : आतापर्यंत विरोधी पक्षांचे १४१ खासदार निलंबित !
लोकसभा हिवाळी अधिवेशन २०२३
|
नवी देहली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या १२ व्या दिवशी म्हणजे १९ डिसेंबरला विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनावरून दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. खासदारांनी सदनाच्या आत आणि सभागृहाच्या प्रवेशद्वारावर, तसेच परिसरात घोषणाबाजी केली. यामुळे आणखी ४९ विरोधी खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. आता एकूण १४१ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर लोकसभेच्या प्रश्न सूचीतून निलंबित खासदारांच्या वतीने विचारण्यात आलेले २७ प्रश्न काढून टाकण्यात आले आहेत.
Lok Sabha Speaker Om Birla criticised opposition for politicisation of Parliament Security breach.
— News Arena India (@NewsArenaIndia) December 18, 2023
१. राज्यसभेत एकूण २४५ खासदार आहेत. यांमध्ये भाजप आणि त्याचे मित्रपक्ष यांचे १०५, तर ‘इंडी’ आघाडीचे ६४ आणि इतर ७६ जणांचा समावेश आहे. यांपैकी ६२ विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
#WATCH TMC सांसद कल्याण बनर्जी ने संसद परिसर में राज्यसभा के सभापति जगदीप धनखड़ की नकल की। pic.twitter.com/nKlYPPCGiC
— ANI_HindiNews (@AHindinews) December 19, 2023
२. लोकसभेतील खासदारांची सध्याची संख्या ५३८ आहे. यात सरकारचे ३२९, ‘इंडी’ आघाडीचे १४२, तर इतर पक्षांचे ६७ खासदार आहेत. त्यांपैकी ७९ विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
संसदेतील ठळक घडामोडी अशा… !
- तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केली. या वेळी राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. याविषयी धनखड यांनी संसदेत अप्रसन्नता व्यक्त केली.
#WATCH टीएमसी सांसद कल्याण बनर्जी द्वारा राज्यसभा सभापति की नकल करने और कांग्रेस सांसद राहुल गांधी द्वारा घटना का वीडियो बनाने पर जगदीप धनखड़ ने कहा, "गिरावट की कोई हद नहीं है…मैं यही कहूंगा कि उन्हें सद्बुद्धि आए…" pic.twitter.com/eAwivnw5F0
— ANI_HindiNews (@AHindinews) December 19, 2023
- विरोधी पक्षनेत्यांकडून ‘मोदी मुर्दाबाद’, ‘तानाशाही मुर्दाबाद’ आणि ‘मोदी सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.
- ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय अभ्यासक के. विक्रम राव यांच्या मते एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने सदस्यांना संसदेतून निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- सभापती ओम बिर्ला यांनी म्हटले की, संसदेच्या सुरक्षेच्या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी चालू आहे. याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या घटनेच्या संदर्भात राजकारण होणे दुर्दैवी आहे. लोकशाही व्यवस्थेतच सभागृहात चर्चा व्हायला हवी.
संपादकीय भूमिकाजगात भारतीय लोकशाहीची थट्टा करणारे हे आणखी एक उदाहरण ! संरक्षणव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक असतांना त्यावर राजकारण करणे हे विरोधी पक्षांच्या खासदारांना लज्जास्पद ! |