आगरा (उत्तरप्रदेश) येथे जैन मुनींविषयी अपशब्द वापरणार्या आसिफला अटक !
आगरा (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील रकाबगंज शहरात आसिफ नावाच्या युवकाने जैन मुनी सुधा सागर यांच्याविषयी अपशब्दांचा वापर केला. या वेळी तेथे असलेल्या जैन समाजाच्या लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्या लोकांनाही ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. संतप्त लोकांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करून आसिफच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आसिफला अटक केली.
संपादकीय भूमिकाधर्मांधांचा उद्दामपणा जाणा ! |