MP Loudspeaker : मध्यप्रदेशमध्ये प्रार्थनास्थळांवरील भोंगे हटवण्याचे काम चालू !
अनेक मशिदींवर लावण्यात आले होते ७ भोंगे
भोपाळ – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी राज्यभरातील प्रार्थनास्थळांवरील भोंगे काढण्याचा आदेश दिला होता. त्याची कार्यवाही तातडीने चालू झाली आहे. इंदूर, कटनीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी प्रार्थनास्थळांवरील भोंगे हटवण्यात व्यस्त आहेत.
इंदूरमधील अनेक मशिदींवरील भोंगे हटवण्यात आले आहेत. इंदूरच्या ग्रामीण भागातील अनेक मशिदींमध्ये ७ भोंगे लावल्याचे आढळून आले. सावेर, बडगोंद, किशनगंज इत्यादी भागांतील अनेक मशिदींवरील भोंगे पोलिसांनी काढून टाकले आहेत. कटनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही मंदिरांवरील भोंगेही हटवण्यात आले आहेत.