धर्माभिमान आणि राष्‍ट्राभिमान वाढवणार्‍या लिखाणाची आवश्‍यकता !

‘सनातन प्रभात’ हे नियतकालिक राष्‍ट्र, धर्म आणि समाज यांच्‍या उत्‍कर्षासाठी समर्पित आहे. या नियतकालिकांच्‍या माध्‍यमातून वाचकांसाठी धर्म, साधना, अध्‍यात्‍म, राष्‍ट्र, सामाजिक विषय यांसारख्‍या विविध विषयांच्‍या संदर्भात प्रबोधन केले जात आहे. गेल्‍या २५ वर्षांत या विषयांच्‍या संदर्भात अनेक लेखमालिका वाचकांसाठी उपलब्‍ध करून दिलेल्‍या आहेत. सध्‍याच्‍या पिढीला शालेय शिक्षणामधून वा अन्‍य कोणत्‍याही मार्गाने त्‍यांचा धर्माभिमान आणि राष्‍ट्राभिमान वाढीस लागेल, असे शिक्षण दिले जात नाही. त्‍यासाठी अशा प्रकारचे लिखाण ‘सनातन प्रभात’च्‍या माध्‍यमातून वाचकांसाठी उपलब्‍ध करून देण्‍याचा मानस आहे. आजवर काही नियतकालिकांनी त्‍यांच्‍याकडील हिंदूंचा इतिहास, थोर राजे, क्रांतीकारक, सण अन् उत्‍सव यांचे महत्त्व यांसारख्‍या विविध विषयांवरील लिखाण ‘सनातन प्रभात’ला उपलब्‍ध करून दिले आहे. यांसारख्‍या विषयांच्‍या संदर्भातील लिखाण कुणाकडे असल्‍यास तेही ‘सनातन प्रभात’मधून प्रकाशित करण्‍यासाठी पाठवू शकता.

हे लिखाण प्रकाशित करतांना त्‍यासाठी आवश्‍यक तो संदर्भ आणि लेखकाचे नावही प्रकाशित केले जाईल, तसेच त्‍याच्‍या ४ – ५ छापील प्रतीही संबंधितांना पाठवल्‍या जातील. – संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह.

लिखाण पाठवण्‍यासाठी संपर्क आणि इ-मेल पत्ता : panveldainik@gmail.com

अथवा व्‍हॉट्‍सअ‍ॅप क्र. ९१५२५ ६९३२५ यावर लिखाण पाठवा !