रत्नागिरी जिल्ह्यात ७ गावांत कृषी योजनांचा जागर !
रत्नागिरी – संगमेश्वर तालुक्यातील मौजे-ओझरखोल येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम अंतर्गत उपस्थित शेतकर्यांना कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’, फळपीक विमा योजना, जमीन आरोग्य पत्रिका महत्त्व, मग्रारोहयो फळबाग लागवड योजना, शेतकरी अपघात विमा आदी योजनेंविषयी कृषी साहाय्यक घोबाळे यांनी मार्गदर्शन केले. सुभाष रावजी पाताडे यांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा’ या योजनेचा २ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला.
दापोली तालुक्यातील मौजे-नवानगर येथे शेतकर्यांना कृषीविषयक केंद्र आणि राज्य पुरस्कृत मुख्य योजना फळपीक विमा योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, जमीन आरोग्य पत्रिका वितरण अभियान, मग्रारोहयो फळबाग लागवड योजना , सेंद्रिय शेती आदींविषयी कृषी पर्यवेक्षक मिनल शिंदे यांनी माहिती दिली. राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत विल्ये आणि संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत बोंड्ये येथे कृषी विभागाच्या विविध योजना तालुका कृषी अधिकारी भोये यांनी माहिती दिली. मंडणगड तालुक्यातील ग्रामपंचायत माहू येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मौजे – बोंडीवली येथे उपस्थित शेतकर्यांना कृषीविषयक केंद्र आणि राज्य पुरस्कृत मुख्य योजनांविषयी माहिती कृषी पर्यवेक्षक मिनल शिंदे यांनी दिली. संगमेश्वर तालुक्यातील मौजे-वांद्री येथे उपस्थित शेतकर्यांना विविध योजनेंविषयी कृषी साहाय्यक घोबाळे यांनी मार्गदर्शन केले.