NIA Raid : राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून ‘इस्लामिक स्टेट’ च्या १९ ठिकाणांवर धाडी !
नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) देशातील ४ राज्यांमध्ये १९ ठिकाणी ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेच्या तळांवर धाडी घातल्या. यामध्ये कर्नाटकातील ११, झारखंडमध्ये ४, महाराष्ट्रात ३ आणि देहलीत १ ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. या धाडीत ‘एन्.आय.ए.’ने मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, धारदार शस्त्रे, संवेदनशील कागदपत्रे आणि विविध डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. हे आरोपी भारतात ‘परदेशी आतंकवाद्यांच्या’च्या सूचनेवरून काम करत होते आणि त्यांचा देशातील आतंकवादी कारवायांमध्ये सक्रीय सहभाग होता.
गेल्या आठवड्यात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने महाराष्ट्रात ४० हून अधिक ठिकाणी धाडी घालून १५ जणांना कह्यात घेतले होते. अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांपैकी एक ‘इस्लामिक स्टेट’चा प्रमुख होता. तो ‘इस्लामिक स्टेट’ मध्ये नव्याने भरती झालेल्यांना या संघटनेशी एकनिष्ठ रहाण्याची शपथ देत होता.
संपादकीय भूमिका‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेचे देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात जाळे पसरेपर्यंत भारताच्या गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षायंत्रणा काय करत होत्या ?’, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्यास आश्चर्य वाटू नये ! |