श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणावरील निर्णय उच्च न्यायालयाने ठेवला सुरक्षित !
२१ डिसेंबरला होणार सुनावणी
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणासाठी न्यायालय आयुक्तांच्या नियुक्तीवरील निर्णय दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सुरक्षित ठेवला आहे. यावर आता २१ डिसेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे. ‘सर्वेक्षणामध्ये न्यायालय आयुक्त कोण असणार ?’, ‘किती सदस्य असणार ?’, ‘सर्वेक्षण कधीपासून प्रारंभ होऊन ते किती दिवसांत पूर्ण करण्यात येणार ?’, यांवर सुनावणी करण्यात येणार होती; मात्र न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत निर्णय सुरक्षित ठेवला.