मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील हॉटेलमध्ये थुंकून रोटी बनवण्यार्याच्या विरोधात हिंदु जागरण मंचकडून तक्रार !
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून कारवाई करण्याची मागणी !
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील एक व्हिडिओ ‘एक्स’वरून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून तो शहरातील मुसलमानबहुल भागातील असल्याचे म्हटले जात आहे. ३८ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये हाजी मकबूल ताहरी ढाब्यात टोपी घातलेला एक माणूस ‘रोटी’ बनवतांना दिसत आहे. व्हिडिओत तो रोटींवर थुंकत असून त्यानंतर त्या तंदूरमध्ये टाकत असल्याचे दिसत आहे. यावरून मुझफ्फरनगर येथील हिंदु जागरण मंचाच्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी या ढाब्याचे मालक आणि तेथे काम करणारी संबंधित व्यक्ती यांच्या विरोधात पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे.
१. ‘एक्स’वर याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना एका हिंदूने लिहिले आहे की, (थुंकी लावून रोटी बनवण्याला) ‘हलाल’ म्हणतात. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
२. हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, समाजात द्वेष पसरवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी हॉटेल आहे, तेथून मुसलमानबहुल खालापार क्षेत्र चालू होते. या घटनेमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या हॉटेलमध्ये सर्व धर्मांचे लोक खायला जातात.