Cancer Cases : देशात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत होत आहे वाढ ! – केंद्रीय आरोग्यमंत्री
नवी देहली – भारतात कर्करोगाचे रुग्ण वाढत असून वर्ष २०२० मध्ये १३ लाख ९३२ सहस्र, वर्ष २०२१ मध्ये १४ लाख २६ सहस्र, तर वर्ष २०२२ मध्ये ही संख्या १४ लाख ६१ सहस्र इतकी झाली, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. देशात कर्करोगाच्या उपचारासाठी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत ३९ नवीन रुग्णालये उघडण्यात आली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
क्षयरोगाच्या रुग्णांच्या संख्येत घट !
अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात आरोग्य राज्यमंत्री डॉ. प्रवीण भारती यांनी लोकसभेत सांगितले की, देशात क्षयरोगाच्या रुग्णांत वर्ष २०२२ च्या प्रारंभीच्या तुलनेत घट झाली;
मात्र उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये वाढ झाली. वर्ष २०१५ च्या तुलनेत देशात क्षयरोगाचे प्रति १ लाखात २३७ रुग्ण होते. त्यात वर्ष २०२२ मध्ये १६ टक्के घट होऊन प्रति एक लाखांमागे १९९ झाले आहेत. तसेच मृत्यूंमध्ये वर्ष २०१५ च्या तुलनेत १८ टक्क्यांची घट झली आहे.
संपादकीय भूमिकासरकारने यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असेच जनतेला वाटते ! |