Iran : इस्रायलसाठी हेरगिरी करणार्या इराणी नागरिकाला इराणने दिली फाशी !
तेहरान (इराण) – इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’साठी हेरगिरी केल्यावरून इराणने त्याच्या एका नागरिकाला फाशी दिली. इराणच्या न्यायपालिकेचे संकेतस्थळ ‘मिझान’ने या शिक्षेला दुजोरा दिला; मात्र फासावर लटकलेल्या व्यक्तीविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. दोषी आढळलेल्या व्यक्तीकडून काही गोपनीय कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. ही कागदपत्रे इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसादला देण्यात आली होती आणि त्याबदल्यात या व्यक्तीने पैसे मिळवले होते. या व्यक्तीला एप्रिल मासामध्ये अटक करण्यात आली होती.
इराणमध्ये गेल्या १० दिवसांत ४२ जणांना फाशी देण्यात आली. ‘इराण ह्युमन राइट्स’च्या अहवालात ही गोष्ट समोर आली आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले बहुतांश अल्पसंख्य बलुच समुदायातील आहेत. मानवाधिकार संघटनेच्या अहवालात म्हटले आहे की, इराणने वर्ष २०२३ मध्ये १९४ लोकांना फाशी देण्यात आली; मात्र यांपैकी केवळ दोनच जणांना फाशीची शिक्षा दिल्याची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाभारतातही पाकसाठी हेरगिरी करणार्यांना अशीच शिक्षा दिली, तर इतरांवर वचक बसेल ! |