महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये राज्यात पुणे चौथ्या स्थानी !
३७६ हून अधिक बलात्काराच्या घटनांची नोंद !
पुणे – शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तसेच लग्नाचे आमीष दाखवून महिला आणि तरुणी यांवरील लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. यात अल्पवयीन मुलींवरही अत्याचार होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये पुणे राज्यात चौथ्या स्थानी असून शहरात गेल्या वर्षी यांदर्भातील २ सहस्र ७४ गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. त्यामुळे महिलांवरील वाढते अत्याचार, हा चिंतेचा विषय ठरत आहे. महिलांवर सामाजिक माध्यमातूनही विनयभंग केल्याच्या घटना घडत आहेत. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे.
ओळखीच्या व्यक्तींकडूनही अत्याचार !
पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रतिदिन प्रविष्ट होणार्या महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये ओळखीच्या अथव्या नात्यातील व्यक्तींकडूनही अत्याचार केले जात असल्याचे समोर येत आहे. यासह अल्पवयीन मुलींना प्रेमाचे किंवा लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केले जातात. पुणे शहरात या प्रकारच्या १ सहस्र १३९ गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये आहे. सामाजिक माध्यम, तसेच भर रस्त्यात पाठलाग करून विनयभंग केला जातो. ‘एम्.आय.डी.सी.’ आणि कामाच्या ठिकाणी असे प्रकार अधिक घडतात.
वाहनाद्वारे, तसेच पायी गस्त !
पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मुख्य चौक आणि रस्ते येथे वाहनांद्वारे, तसेच पायी गस्त घालण्यात येते. त्यामुळे मुख्य रस्त्यांसह चौकांमध्ये, तसेच सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा वावर वाढला आहे. परिणामी महिलांची छेडछाड, सोनसाखळी चोरी यांसह इतर गुन्हे नियंत्रणात आले आहेत. तसेच पुणे शहरात ४० दामिनी पथके, तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ३२ दामिनी पथके आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत दामिनी पथके नियुक्त आहेत. महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे तात्काळ प्रविष्ट करण्याविषयी न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे नोंद केले जातात. त्यामुळे गुन्हे नोंद होण्याचे प्रमाण वाढत आहे. (केवळ गुन्हे नोंद करून न थांबता न्यायालयात खटला जलद गतीने चालवण्यासह आरोपींना शिक्षा होण्यासाठीही तितक्याच तत्परतेने कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक)
संपादकीय भूमिका :
|