केरळमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू !
कोरोनाचा नवा उपप्रकार सापडला !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – तमिळनाडूमध्ये कोरोना विषाणूचा नवा उपप्रकार आढळून आला आहे. ‘जेएन्. १’ असे याचे नाव आहे. ‘जेएन्. १’ सर्वप्रथम लक्झमबर्गमध्ये सापडला होता. त्यानंतर तो अनेक देशांमध्ये पसरला. दुसरीकडे केरळमध्ये कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अब्दुल्ला (वय ८० वर्षे) असे मृत रुग्णाचे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्यातील आरोग्य अधिकार्यांच्या संपर्कात आहे.
सौजन्य वनइंडिया न्यूज
केरळमध्ये कोरोना महामारी पसरण्याचा धोका लक्षात घेता आरोग्यमंत्री दिनेश कुंडू राव यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आणि मुखपट्टी (मास्क), ऑक्सिजन सिलिंडर, औषधे यांसह अन्य आवश्यक वस्तूंचा साठा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.