श्रीनगरमध्ये पोलीस हवालदारावर गोळीबार करणार्या ३ ‘हायब्रिड आतंकवाद्यां’ना अटक !
(‘हायब्रिड आतंकवादी’ म्हणजे अशा व्यक्ती ज्या आतंकवादी आक्रमण केल्यानंतर सर्वसाधारण जनतेचा भाग बनून स्वत:चे काम करू लागतात.)
श्रीनगर – श्रीनगर पोलिसांनी ३ ‘हायब्रिड आतंकवाद्यां’ना अटक केली आहे. जम्मू-काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी ही माहिती दिली. या आतंकवाद्यांवर ९ डिसेंबर या दिवशी पोलीस हवालदार महंमद हाफीज चाक यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या वेळी त्यांनी हवालदारावर ६ गोळ्या झाडल्या होत्या. या आक्रमणात ते गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
संपादकीय भूमिकाजोपर्यंत जिहादी आतंकवादाचा निर्माता पाकला संपूर्णपणे नष्ट करत नाही, तोपर्यंत अशा प्रकारे आतंकवादी आक्रमणे होतच रहाणार आणि त्यांच्या नव्या पिढ्या निपजतच रहाणार ! |