Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपच्या नेत्याची आतंकवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या
इटानगर (अरुणाचल प्रदेश) – अरुणाचल प्रदेशातील खोंसा (पश्चिम) मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार आणि नेते यमसेन माटे यांची आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. (ईशान्येत फोफावलेला आतंकवाद आता स्वपक्षातील नेत्याला लक्ष्य करत असतांना केंद्रातील भाजप सरकारने तो संपवण्यासाठी पावले उचलावीत, अशीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे ! – संपादक) ही घटना भारत-म्यानमार सीमेवरील तिरप जिल्ह्यातील राहो गावामध्ये घडली. माटे वैयक्तिक करणानिमित्त येथे त्यांच्या ३ समर्थकांसह आले असतांना ही घटना घडली.