Delhi Metro Death : देहली मेट्रोच्या दरवाज्यात साडी अडकल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू !
नवी देहली – देहली मेट्रोच्या दरवाज्यात एका महिलेची साडी अडकल्याने झालेल्या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटना १४ डिसेंबरची असून गंभीर घायाळ झालेल्या महिलेला विविध रुग्णालयांत नेऊन शेवटी सफदरजंग रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु तिचे प्राण वाचवता आले नाहीत.
१४ डिसेंबरला शहरातील इंद्रलोक मेट्रो स्थानकावरून जाणार्या मेट्रोमध्ये रीना नावाच्या ३५ वर्षीय महिलेची साडी अडकली. या वेळी मेट्रोच्या ‘सेन्सर’मध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मेट्रोचे दरवाजे तसेच बंद झाले आणि मेट्रो चालू लागली. यामुळे मेट्रोसोबत महिला फरफटत गेली. स्थानकाच्या शेवटी असलेल्या फाटकाला महिला आदळली. यामध्ये तिला पुष्कळ गंभीर दुखापत झाली. डोक्यालाही मार लागल्याने ती त्या दिवशीच ‘कोमा’मध्ये गेली. अनेक ठिकाणी अस्थीभंग झाला. शेवटी १७ डिसेंबरला तिला मृत घोषित करण्यात आले. मेट्रो प्रशासनाने या प्रकरणी समिती नेमली असून या घटनेचे अन्वेषण करण्यात येत आहे.