धार्मिक स्थळे मद्य-मांस विक्री मुक्त करण्याविषयी सभागृहात विषय मांडू !
विविध आमदारांचे आश्वासन
नागपूर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धार्मिक स्थळे मद्य-मांस विक्री मुक्त करा’ या मागणीचे निवेदन विविध आमदारांना देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील, बालाजी किणीकर, पुणे (भोसरी) येथील भाजपचे आमदार महेश लांडगे, चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची सदिच्छा भेट घेऊन हे निवेदन दिले. या वेळी सर्व आमदारांनी हा विषय सभागृहात उपस्थित करण्याचे आश्वासन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी ‘पर्यटनवृद्धी’च्या नावाखाली बिअरबार, डान्सबार, ‘मटन शॉप’ मोठ्या प्रमाणात उघडली जातात. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांना सुख-सुविधा अवश्य उपलब्ध कराव्यात; मात्र पवित्र स्थानांचे पावित्र्यही जपले जायला हवे. त्यामुळे धार्मिक स्थळे ही मद्य-मांस विक्री मुक्त असायला हवीत.