नारायणगाव (पुणे) येथे श्री मुक्ताबाईदेवीचे पुजारी म्हणून यापुढील काळात पगारी व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार !
ग्रामसभेच्या बैठकीत निर्णय !
पुणे – नारायणगाव ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली. या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी श्री मुक्ताबाई मंदिरात ग्रामसभेचे आयोजन केले होते. या वेळी विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा असलेल्या नारायणगाव (तालुका जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री मुक्ताबाई मंदिरात पगारी पुजारी नेमणूक, श्री मुक्ताबाई आणि काळोबा देवस्थान ट्रस्टच्या नवीन पदाधिकार्यांची निवड, विकासकामांना गती देण्यासाठी आणि स्थानिक अडचणी सोडवण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. (मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला असून तेथे होणारे विधी अथवा पूजा ही धर्मशास्त्रसंमतच व्हायला हवी. पुजारी धर्मशास्त्राचा जाणकार असण्यासह त्याच्यात देवतेप्रती भावभक्ती असणेही आवश्यक आहे. याची काळजी ग्रामपंचायत घेईल का ? – संपादक)
या वेळी ‘विघ्नहर’ कारखान्याचे संचालक संतोष खैरे, उपसरपंच योगेश पाटे, देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष एकनाथ शेटे, संतोष वाजगे आदींनी भाग घेतला.