हिंदुत्वद्रोही नेत्यांना वठणीवर आणण्यासाठी हिंदु समाज जागृत आणि संघटित कधी होणार ?
हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने झालेले हिंदु !
१. जन्महिंदुरूपी विषारी किडीवर हिंदुत्वनिष्ठरूपी औषधांचा फवारा हवा !
या देशात केंद्रामध्ये हिंदुत्वनिष्ठ शासन आल्यानंतर अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची ओरड सातत्याने हिंदुद्वेष्ट्यांकडून केली जात आहे. मुळात वस्तूस्थिती अशी आहे की, केंद्रात हिंदुत्वनिष्ठ शासन आल्यापासून या हिंदुद्वेष्ट्यांच्या जीभा सैल सुटल्या आहेत. त्यांचे त्यांच्या जिभेवरचे नियंत्रण पूर्णपणे सुटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर प्रतिदिन शिव्यांची लाखोली वाहिली जात असते. मोदी यांच्यासाठी वापरलेल्या ‘मौतका सौदागर’, ‘नीच किसमका आदमी’, ‘मोदी तेरी कबर खुदेगी’ अशी शब्दांची जंत्री देतो म्हटले, तर ती पुष्कळ मोठी होईल. धर्मांध मुसलमान नेते आणि मौलवी यांनी (इस्लामचे अभ्यासक) मोदींना शिव्यांचा रतीब घालणे स्वाभाविक आहे; पण अपघाताने हिंदु म्हणून जन्मलेले हिंदूही या संदर्भात थोडेही मागे नाहीत. नुकत्याच केलेल्या एका भाषणात काँग्रेसचे ज्येष्ठ पुढारी मनीष तिवारी म्हणाले, ‘‘भाजपला मते देणारे सर्व मतदार राक्षस आहेत’’, म्हणजे एखाद्या हिंदुत्वनिष्ठ पक्षाला मतदान करणे, हे कृत्य राक्षसीपणाचे ठरत असेल, तर मग ‘हिंदुविरोधी पक्षाला मतदान करून हिंदूंनी त्यांची कबर आपल्याच हाताने खोदावी’, असे मनीष तिवारी यांचे म्हणणे आहे का ? मनीष तिवारींसारख्या अपघाताने हिंदु म्हणून जन्मलेल्या हिंदु नेत्यांचे अमाप पीक या देशात सध्या आलेले आहे. प्रखर हिंदुत्वनिष्ठ औषधांचा फवारा मारून प्रथम या देशाचा घात करणार्या या विषारी पिकाचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे !
२. भारताचे ‘तुकडे’ आणि ‘बरबादी’ (नाश) हे ध्येय ठेवणार्या कन्हैयाकुमारच्या काँग्रेस पक्षप्रवेशाला विरोध न करणारे त्यांचे जन्महिंदु नेते !
सध्या आपल्या देशात एक धंदा चांगला चालू आहे. ज्याची शिपाई होण्याचीही लायकी नाही, त्याने भारतविरोधी आणि हिंदुविरोधी वाह्यात अन् विषवत् विधाने केली की, तो नालायक माणूस एका रात्रीतून हिंदुविरोधी पक्षाचा मोठा नेता होतो. त्याच्यावर पद, प्रतिष्ठा आणि पैसा याचा वर्षाव होतो. देशविरोधी कारवाया करणार्या ज्या तत्त्वांना जेथे आश्रय आणि प्रोत्साहन मिळते, त्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात (‘जे.एन्.यू.’त) काही कालावधीपूर्वी कन्हैयाकुमार या तथाकथित विद्यार्थ्याच्या नेतृत्वाखाली जमलेल्या देशविरोधी तत्त्वांकडून ‘भारत तेरे टुकडे होंगे, इन्शाअल्ला इन्शाअल्ला’, ‘अफझल हम शर्मिन्दा है, तेरे कातील जिंदा है’, ‘भारत तेरे बरबादी तक जंग रहेगी, जंग रहेगी’, अशा देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. खरेतर दुसर्या एखाद्या देशात कुणी एखाद्याने अशा देशद्रोही घोषणा दिल्या असत्या, तर त्याला तात्काळ पकडून कारागृहात टाकले असते आणि नंतर त्याला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा झाली असती; पण
कन्हैयाकुमारवर कायदेशीर कारवाईची किंवा त्याला अटक करण्याची अनुमती जे.एन्.यू.च्या प्रशासनाने आणि देहलीच्या केजरीवाल यांच्या सरकारने अनेक मास दिलीच नाही. पुढे तर या महाशयांना काँग्रेसने तिच्या पक्षात सन्मानाने प्रवेश दिला ! पद दिले; पण काँग्रेस पक्षातील एकाही हिंदु नेत्याने कन्हैयाकुमारच्या पक्षप्रवेशाला विरोध केला नाही किंवा एका शब्दानेही निषेध केला नाही. या जन्महिंदु नेत्यांना हिंदु तरी कसे म्हणावे ? असा प्रश्न मला पडतो.
३. संस्कृत विद्यापिठाला विरोध करणारे जन्महिंदु नेते !
भारतातील अनेक प्रमुख भाषांचा जन्म संस्कृत भाषेतूनच झाला आहे. संस्कृतमध्ये ज्ञान-विज्ञानाचे भांडार सामावलेले आहे. संस्कृत भाषेमुळेच या देशाची संस्कृती आणि एकात्मता टिकून आहे. संस्कृत ही संगणकासाठी अत्यंत योग्य भाषा असल्याचे सिद्ध झाल्यामुळे अनेक पाश्चात्त्य आणि युरोपीय देशातील विद्यापिठांमध्ये संस्कृत भाषा शिकवली जाते; पण ज्या देशात संस्कृत या वैज्ञानिक अन् समृद्ध भाषेचा जन्म झाला, त्या भारत देशामध्ये मात्र या भाषेची घोर उपेक्षा केली जात आहे. कर्नाटकात संस्कृत विद्यापीठ उघडण्याचे ठरवले गेले, तेव्हा या विद्यापिठाला आपल्या धर्मांध आणि जिहादी वृत्तीप्रमाणे पी.एफ्.आय. (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या संघटनेने विरोध केला. संस्कृत विद्यापिठाला पी.एफ्.आय. या मुसलमान संघटनेने विरोध करणे एक वेळ समजू शकते. जे जे हिंदूंना प्रिय आणि पूज्य आहे, त्या सर्वांचा विरोध करणे, ही मुसलमानांची मानसिकता पुष्कळ जुनी आहे; पण एका हिंदु नेत्यानेही संस्कृत भाषेला विरोध करावा, याला काय म्हणावे ? कर्नाटक काँग्रेसचे प्रवक्ते ए.एन्. नटराजा बरळले, ‘‘संस्कृत ही परकीय भाषा आहे. ही भाषा शिकल्याने हिंदु मुले धर्मांध होतील !’’, अशा शब्दांत त्यांनी गरळ ओकली. ‘संस्कृत ही परकीय भाषा आहे’, असे म्हणणार्या या हिंदु नेत्याच्या अज्ञानाची कीव करावी तेवढी अल्पच ! ‘संस्कृत भाषा शिकल्यामुळे माणूस धर्मांध नव्हे, तर उदार, सहिष्णु आणि सुसंस्कृत बनत असतो’, हेही या मुसलमानांच्या मतांपायी आंधळे झालेल्या हिंदु नेत्याला माहिती नसावे, हे केवढे दुर्दैव ! संस्कृत भाषा शिकल्याने हिंदूंचा एक तरी विद्यार्थी अथवा व्यक्ती धर्मांध झाल्याचे उदाहरण आहे का ? उलट धर्मांधांनी संस्कृत भाषा शिकून ग्रंथ वाचले, तर ते निश्चितच सहिष्णु आणि समंजस होतील, याची निश्चिती आहे !
४. हिंदुद्वेषाचे भूत मानगुटीवर बसल्याने बेताल बडबड करणारे जन्महिंदु अभिनेते कमल हसन !
स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्यासाठी मुसलमान आणि ख्रिस्ती यांची मते आपल्या झोळीत पडावीत यासाठी या देशातील हिंदु नेते अथवा अभिनेते केव्हा काय बरळतील, हे सांगणे कठीण आहे. ‘मक्कल निधी मथ्थम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक आणि दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम अभिनेते कमल हसन एकदा बरळले, ‘‘राजा चोल यांच्या काळात ‘हिंदु’ नावाचा कोणताही धर्म नव्हता. ‘हिंदु’ शब्द इंग्रजांनी आणला. ‘हिंदु’ हा शब्द किती प्राचीन आहे आणि तो अनेक हिंदु पुराणांत आला आहे, हे वास्तव कमल हसन यांना कुणी समजून सांगावे ? पुराणांची निर्मिती तर इंग्रज येण्यापूर्वी लाखो वर्षे अगोदर झाली आहे. पुराणात पुराणकारांनी ‘हिंदु’ शब्दाच्या केलेल्या अनेक व्याख्या सांगता येतील; पण विस्तारभयास्तव येथे सांगता येत नाहीत आणि चोल राजवंशाविषयी काय अन् किती सांगावे ? ९ व्या शतकापासून १३ व्या शतकापर्यंत चोल राजांनी दक्षिणेत एका बलाढ्य आणि समृद्ध हिंदु राज्याची निर्मिती केली होती. त्यांनी हिंदु देवतांची तंजावरचे बृहदीश्वर, गंगाई कोंडा चोलाश्वरमचे मंदिर, दारासुरम् येथील ऐरावतेश्वर मंदिर अशी अनेक मंदिरे बांधली, जी त्यांच्या अप्रतिम शिल्पकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. मग ‘चोल यांच्या राजवटीत हिंदु धर्म नव्हता’, असे धादांत खोटे विधान कमल हसन कसे करू शकतात ? पण हिंदुद्वेषाचे भूत एकदा मानगुटीवर बसले की, ती व्यक्ती अशीच बेताल बडबड करत असते !
५. हिंदूंच्या धर्मग्रंथांना जाळण्यास सांगून इस्लामचा उदो उदो करणारे चंद्रशेखर यादव यांच्यासारखे जन्महिंदू !
बिहार राज्याचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यादव यांनी केलेले एक विधान नुकतेच माझ्या वाचनात आले. ते म्हणाले,‘‘मनुस्मृती, रामचरितमानस, गोळवलकरगुरुजी यांचे ‘वंच ऑफ थॉट्स’ ही पुस्तके जाळून टाकण्यासारखी आहेत; कारण या ग्रंथांनी द्वेष पसरवण्याचे काम केले आहे. प्रेम आणि विश्वास देणारा केवळ इस्लाम धर्म आहे.’’ प्रश्न असे आहेत की, चंद्रशेखर हे जे ग्रंथ जाळण्याच्या लायकीचे आहेत, असे म्हणतात, ते ग्रंथ त्यांनी वाचलेले आहेत का ? ‘प्रेम आणि विश्वास देणारा केवळ इस्लाम धर्म आहे’, असे जे ते म्हणतात त्या इस्लामचा संदेश देणारे ‘कुराण’ हे धार्मिक पुस्तक त्यांनी वाचले आहे का ? त्यातील ‘जे मुसलमान नाहीत, त्या काफिरांसमवेत कसे वर्तन करायचे ?’, याचा स्पष्ट आदेश देणारे आयते (ओळी) त्यांनी वाचले आहेत का ?’ कुराणातील या अशा काही आयातांपासून प्रेरणा घेऊन जगात ज्या शेकडो आतंकवादी संघटना निर्माण झाल्या आहेत त्या कुणाच्या आहेत ? हिंदूंच्या कि मुसलमानांच्या ? ‘सर्व मुसलमान आतंकवादी नसतात; पण सर्व आतंकवादी मुसलमानच असतात’, हे समीकरण सर्वत्र का रूढ झाले ? भारतातील ६०० वर्षांच्या प्रदीर्घ मुसलमान राजवटींनी भारतातील हिंदूंना कोणता प्रेमाचा आणि विश्वासाचा संदेश दिला ? भारतात काँग्रेसच्या राजवटीत जे शेकडो बाँबस्फोट आणि आत्मघातकी आक्रमणे झाली, ती कुणी केली ? भारतात वारंवार दंगली घडवून हिंदूंच्या जीवित आणि वित्त यांची अपरिमित हानी कोण करत असतात ? काश्मीरमधून ५ लाख हिंदूंना कुणी हाकलून लावले ? केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जग कुणाच्या आतंकवादामुळे अशांत आणि असुरक्षित आहे ? वर्ष १९४७ मध्ये भारताच्या विभाजनाच्या वेळी १० लाख हिंदु स्त्री-पुरुष आणि लहान बालकांची ही अमानुषपणे कत्तल झाली. हिंदूंच्या स्त्रियांवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आले. यातून मुसलमानांनी जगाला आणि विशेषतः हिंदूंना कोणता प्रेमाचा अन् विश्वासाचा संदेश दिला ? या सर्व प्रश्नांची उत्तरे चंद्रशेखर यादव यांनी प्रथम दिली पाहिजेत आणि मगच त्यांनी त्यांची जीभ उचलून टाळूला लावली पाहिजे.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.
संपादकीय भूमिकासंस्कृत विद्यापिठाला विरोध करणारे जन्महिंदू ती भाषा शिकल्याने एक तरी हिंदु विद्यार्थी अथवा व्यक्ती धर्मांध झाल्याचे उदाहरण दाखवतील का ? |