‘म्हाडा’च्या ५६ वसाहतींत अधिकच्या सेवा शुल्कांमध्ये सवलत ! – अतुल सावे, गृहनिर्माण मंत्री
मुंबईतील ५० सहस्र रहिवाशांना लाभ
नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) – ‘म्हाडा’च्या ५६ वसाहतींतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील वर्ष १९९८ ते २०२१ या कालावधीतील अधिकच्या सेवा शुल्कांमध्ये सवलत देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. यामुळे अनुमाने ३८०.४१ कोटी रुपयांचे अधिकचे सेवा शुल्क माफ होणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील ५० सहस्र सदनिकाधारकांचे समाधान होईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली.