काँग्रेसच्या आमदाराकडून म्हैसुरू विमानतळाला टिपू सुलतानचे नाव देण्याची मागणी !
भाजपचा विरोध
बेंगळुरू (कर्नाटक) – काँग्रेसच्या एका आमदाराने कर्नाटकातील विमानतळांची नावे पालटण्याचा दिलेला प्रस्ताव सर्वसंमतीने मान्य झाला आहे. या प्रस्तावामध्ये म्हैसुरू विमानतळाला ‘टिपू सुलतान विमानतळ’ असे नाव देण्याचे म्हटले आहे. याला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. हुब्बळ्ळी विमानतळाचे नाव क्रांतीकारी संगोली रायन्ना, बेळगाव विमानतळाचे नाव कित्तूर राणी चेन्नमा, शिवमोगा विमानतळाचे नाव डॉ. के.व्ही पुट्टप्पा विमानतळ, अशी नावे देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यानंतर हुब्बळ्ळीतील काँग्रेसचे आमदार प्रसाद अब्बय्या यांनी म्हैसुरू विमानतळाचे नाव टिपू सुलतान विमानतळ ठेवण्याचा प्रस्ताव मांडला.
सौजन्य रिपब्लिक वर्ल्ड
शौचालयांना टिपू सुलतानचे नाव द्यावे ! – भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ
भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ म्हणाले की, म्हैसुरू विमानतळाला नालवडी कृष्णराज वडेयार यांचे नाव देण्यात यावे. मंदिरे उद्ध्वस्त करणार्या टिपू सुलतानाचे नाव शौचालयांना द्यावे, विमानतळाला नव्हे.
(म्हणे) ‘टिपू सुलतान मुसलमान असल्याने त्याला महत्त्व मिळत नाही !’ – अभिनेते अहिंसा चेतनटिपू सुलतान मुसलमान होता आणि त्याने एकाच दिवसात १ लाख हिंदूंचे धर्मांतर केले, सहस्रो हिंदूंना ठार मारले, तसेच हिंदूंची मंदिरे पाडली. यामुळेच हिंदू त्याच्या नावाने काहीही करण्यास विरोध करत आले आहेत आणि यापुढेही करत राहातील ! टिपू सुलतान ऐतिहासिकरित्या अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे. टिपू सुलतानचे मुसलमान म्हणून जन्म घेणे आजच्या मान्यतेला आड येत आहे. दुर्दैवाने व्यक्तीने जन्म घेतलेल्या समुदायाला त्याच्या सामाजिक देणगीपेक्षा अधिक महत्त्व देण्यात येत आहे. आमदार यत्नाळ यांनी ‘शौचालयांना टिपूचे नाव द्या’, असे म्हटले आहे. शौचालय एकवेळ स्वच्छ करता येईल; परंतु आमदार यत्नाळ यांच्या मनात जाती, धर्म यांच्याविषयी असलेले किटाळ कधीच स्वच्छ करता येणार नाही, असे अभिनेते अहिंसा चेतन यांनी सामाजिक माध्यमांत प्रसारित केलेलेल्या संदेशात म्हटले आहे. तसेच त्यांनी ‘कर्नाटकाच्या इतिहासात नगण्य व्यक्ती असलेल्या केंपेगौडा (विजयनगर साम्राज्याचा एक सरदार केंपेगौडा याने वर्ष १५३७ मध्ये बेंगळुरूची निर्मिती केली) यांना गुलामगिरी करणार्या जातीच्या दबाव गटामुळे प्रसिद्ध व्यक्ती म्हणून प्रतिबिंबित करण्यात येत आहे; परंतु खरोखरच एक ऐतिहासिक वीर योद्धा (टिपू सुलतान) मुसलमान म्हणून जन्माला आल्यामुळे त्याला मान्यता मिळत नाही‘, अशी टीकाही केली. |
संपादकीय भूमिकाकाँग्रेसला मत देऊन तिला सत्तेवर बसवलेल्या कर्नाटकातील हिंदूंना हे मान्य आहे का ? |