रायगड येथून वर्षभरात ८ सहस्र किलो गांजा, २१९ किलो चरस आणि ३१४ किलो मेफेड्रॉन जप्त !
रायगड – येथून वर्षभरात ८ सहस्र किलो गांजा, २१९ किलो चरस आणि ३१४ किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी १८ गुन्हे नोंदवले असून २३ जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यातून विदेशातही अमली पदार्थांची तस्करी चालू आहे.
गेल्या २ मासांत रायगडच्या समुद्रकिनार्यावर २१९ किलो चरसची पाकिटे वाहून आली. अलीबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यांतील किनार्यावर ही पाकिटे सापडली. १ किलो १०० ग्रॅम वजनाच्या १८५ पाकिटांचा यात समावेश होता. त्यांची किंमत ८ कोटी २५ लाख ११ सहस्र रुपयांच्या जवळपास आहे. या प्रकरणी अलीबाग, रेवदंडा, श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हेही नोंदवले आहेत. ‘चरसची पाकिटे कुठून आली ?’, याचा शोध लागलेला नाही. खोपोली, तसेच होनाड येथून पोलिसांनी अनुक्रमे ८५ किलो वजनाचे १०७ कोटी रुपयांचे आणि १७७ किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले.
संपादकीय भूमिकाही संख्या पहाता समाज किती मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाला आहे, हेच यातून लक्षात येते ! व्यसनांचा वाढता विळखा नष्ट करण्यासाठी सरकार आणि प्रशासन यांनी ठोस पावले उचलायला हवीत ! |