Ayodhya Mosque : मुसलमानांना श्रीरामजन्मभूमीच्या बदल्यात दिलेल्या जागेवर देशातील सर्वांत मोठी मशीद उभी रहाणार !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर २२ जानेवारी २०२४ या दिवशी भव्य श्रीराममंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याचप्रमाणे अयोध्येपासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या धन्नीपूर गावात बांधण्यात येणार्या मशिदीचा पायाही रचण्यात येणार आहे. ही भारतातील सर्वांत मोठी मशीद असणार आहे. या मशिदीचे नाव ‘महंमद बिन अब्दुल्ला’, असे असणार आहे. येथे पहिले नमाजपठण मक्केतील इमाम अब्दुल रहमान अल् सुदाईस करणार आहेत, अशी माहिती मुंबईतील भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांनी दिली. त्यांना ‘मशीद विकास समिती’चे अध्यक्ष करण्यात आले आहे. श्रीरामजन्मभूमी प्रकरणावर निकाल देतांना सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला मशीद बांधण्यासाठी मुसलमान पक्षाला ५ एकर भूमी देण्याचा आदेश दिला होता.
अराफत शेख पुढे म्हणाले की, या मशिदीत २१ फूट उंच आणि ३६ फूट रुंद जगातील सर्वांत मोठे कुराण ठेवण्यात येणार आहे. मशिदीच्या आवारात कर्करोग रुग्णालय, शाळा, संग्रहालय आणि वाचनालय बांधले जाणार आहे. येथे शाकाहारी उपाहारगृह बांधले जाईल. तेथे येणार्या लोकांना विनामूल्य जेवण दिले जाईल. या मशिदीची रचना ताजमहालपेक्षाही सुंदर दिसेल. मशिदीत मोठमोठे कारंजे लावण्यात येणार असून ते सायंकाळी चालू असतील. या मशिदीत प्रत्येक धर्माच्या लोकांना येण्याची अनुमती असेल.
संपादकीय भूमिकाया मशिदीतून जिहादी कारवाया होणार नाहीत, याकडे सरकारला लक्ष द्यावे लागेल ! |