राजस्थानमध्ये धावत्या बसमध्ये धर्मांध वाहनचालकाकडून तरुणीवर बलात्कार
|
जयपूर (राजस्थान) – येथे एका धावत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ९ डिसेंबरला घडली. ही बस कानपूरहून जयपूरला जात होती. या खासगी बसमधील चालकाने वाहकाच्या साहाय्याने या १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. विशेष म्हणजे या वेळी बसमध्ये प्रवासी मोठ्या संख्येने होते. पोलिसांनी या प्रकरणी चालक आरिफ खान आणि वाहक ललित कुमार यांना अटक केली आहे.
या तरुणीच्या सीटजवळ मद्यधुंद मुले बसल्याचे सांगून आरिफने तरुणीला त्याच्या म्हणजे चालकाच्या केबिनमध्ये झोपण्यास सांगितले. रात्री त्याने बसवाहकाला गाडी चालवण्यास सांगून मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणी लावली आणि केबिनमध्ये झोपलेल्या तरुणीवर बलात्कार केला. या वेळी तरुणी मोठ्याने ओरडत होती. याची जाणीव बाहेरील प्रवाशांना झाल्यावर त्यांनी गाडी थांबवण्यास भाग पाडले. गाडी थांबवताच चालक आणि वाहक दोघेही पळून गेले. केबिनमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्यावर पोलिसांना बोलावण्यात आले.
संपादकीय भूमिकाराजस्थानमधील काँग्रेसी राजवट संपल्यानंतर आता भाजपचे सरकार आल्यावर अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! |