Bulldozer : भाजपच्या कार्यकर्त्याचा हात तोडणार्या फारूख याच्या घरावर चालवला बुलडोझर !
मध्यप्रदेशात सरकारने केली कारवाई
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशचे भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही आता ‘बुलडोझर’द्वारे कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कार्यकाळात दंगलखोरांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझरद्वारे कारवाई करण्यात येत असे. आता भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र ठाकूर यांचा हात कापणारा फारूख रैन उपाख्य मिन्नी याच्या घरावर प्रशासनाने बुलडोझर चालवला आहे. राजधानीतील जनता कॉलनी क्रमांक ११ येथे फारुखचे घर होते.
५ डिसेंबर या दिवशी मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर फारूखने देवेंद्र ठाकूर यांच्यावर जीवघेणे आक्रमण केले होते. यामध्ये ठाकूर यांच्या हाताचा पंजा कापला गेला. देवेंद्र यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी फारूख याच्यासह समीर, अस्लम, शाहरूख आणि बिलाल यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात येऊन त्यांना याआधीच अटक करण्यात आली आहे. फारूखवर हबीबगंज पोलीस ठाण्यात आधीपासून अनेक गुन्हे नोंद आहेत.
संपादकीय भूमिकाअनेक धर्मांध दंगलखोरांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर फिरवण्याची कारवाई अनेक भाजपशासित राज्यांत केली जात आहे. मुळात अशांना बेकायदेशीर घरे बांधण्याची अनुमती कशी दिली जाते, हा प्रश्न आहे. त्यामुळे यासाठी उत्तरदायींवरही कठोर कारवाई व्हायला हवी ! |