एकाच आधार कार्डवर २ मुसलमान महिलांनी प्रवास केल्याचे उघड !
कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या फुकट बस प्रवास योजना !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकारने घोषणापत्रात घोषित केल्याप्रमाणे महिलांना निःशुल्क बस प्रवास योजना लागू केली आहे. मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी काँग्रेसने ही योजना लागू करताच मुसलमानांकडून याचा दुरुपयोग केला जात असल्याचे दिसून आले. या योजनेमध्ये महिलांना आधार कार्ड दाखवून निःशुल्क प्रवास करता येतो. सामाजिक माध्यमांवर या योजनेशी संबंधित एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात २ मुसलमान महिलांनी बसवाहकाकडे एकच आधार कार्ड दिले. यावर एकच क्रमांक होता आणि त्यावर चेहरा कापडाने झाकलेले छायाचित्र होते. त्यामुळे चेहरा ओळखता येत नव्हता. हुब्बळ्ळी परिवहन मंडळाच्या बसमध्ये ही घटना घडली. हा व्हिडिओ भाजपच्या नेत्याने त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये बसवाहक अधिकार्याला सांगतो की, एकच क्रमांक असलेले आधार दाखवून तोंडावर कापड बांधून २ महिला असा फुकट प्रवास करत आहेत. मुसलमान महिला प्रवासी काहीही करतात, तुम्हीच बघा.
संपादकीय भूमिकाफुकट प्रवासामध्येही अशा प्रकारची बनवाबनवी करणार्या धर्मांध महिलांची गुन्हेगारी मानसिकता लक्षात येते ! याविषयी ढोंगी निधर्मीवादी तोंड उघडणार नाहीत ! |