देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर चिंचवड (जिल्हा पुणे) येथील जिज्ञासूंना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘दळणवळण बंदीपासून चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’ला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सत्संगांच्या माध्यमातून जिज्ञासूंचे साधनेचे प्रयत्न चालू झाले. काही जिज्ञासू आता दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, धर्मशिक्षणाविषयीचे फलक लेखन करणे, अर्पण गोळा करणे, ओळखीच्या लोकांना सनातनच्या सत्संगांच्या ‘लिंक’ पाठवणे, सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांचे वितरण करणे, अशा विविध सेवांमध्ये सहभागी होत आहेत. काही जिज्ञासूंनी व्यष्टी आणि समष्टी साधनेचे चांगले प्रयत्न करून आध्यात्मिक पातळीही गाठली आहे.

१६.१०.२०२२ या दिवशी चिंचवड येथील साधना सत्संगातील जिज्ञासूंनी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. त्या वेळी त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. स्वयंपाकघर आणि भोजनकक्ष पहातांना : ‘महाप्रसादाच्या वेळी भोजनकक्षातील नियोजन, स्वयंपाकघरातील धान्य साठवण्यामधील व्यवस्थितपणा, स्वावलंबन इत्यादी गोष्टी शिकायला मिळाल्या, तसेच पाण्याची, म्हणजेच राष्ट्रीय संपत्तीची बचत करण्यातील भगवंताचा काटकसर हा गुण शिकायला मिळाला.’ – सौ. उषा पाटील, सौ. रसिका जोशी आणि सौ. चारूता माहूरकर

१ आ. आश्रमातील साधक

१. ‘वयस्कर साधक उत्पादनांशी संबंधित सेवा अत्यंत आनंदाने करत होते. तेव्हा ‘सेवेला वयाचे बंधन नसते. त्यासाठी केवळ गुरुचरणांचा ध्यास आणि तळमळ हवी’, हे शिकायला मिळाले.’ – सौ. उषा पाटील, सौ. रीमा देशपांडे आणि सौ. सुरेखा तापकीर

२. ‘आश्रमात साधक सात्त्विक उत्पादने आणि नियतकालिके यांची सेवा नामजप करत साधना म्हणून करतात’, हे पहायला मिळाले. याचा लाभ मला कृतीला भाव जोडण्यासाठी होत आहे.’ – सौ. रसिका जोशी

३. ‘आश्रमातील साधकांकडून प्रीती, त्याग, स्वावलंबन, नियोजन, व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा, इतरांचा विचार करणे, सकारात्मक विचार करणे इत्यादी अनेक गुण शिकायला मिळाले.’ – सौ. उषा पाटील

४. ‘आश्रमातील साधकांची प्रत्येक कृती सुनियोजित होती. ‘नियोजन कसे करायचे आणि त्याचा काय उपयोग होतो ?’, हे प्रत्यक्ष पहायला मिळाले.’ – सौ. रसिका जोशी आणि श्री. अशोक आवारे

५. ‘आश्रमातील साधकांच्या वागण्या-बोलण्यात आत्मीयता होती. त्यामुळे इतके साधक असूनही आश्रमातील वातावरण तणावविरहित, शांत, चैतन्यमय आणि आनंदी होते.’ – सौ. चारूता माहूरकर आणि श्री. अशोक आवारे

१ इ. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या संदर्भात

१. ‘स्वयंसूचना घेऊन आणि चुका लिहून मन स्वच्छ करता येते. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया हा मोक्षाचा मार्ग आहे, हे मनावर बिंबले.’ – श्रीमती नीलम कुलकर्णी

२. ‘प्रतिदिन चुका लिहिल्याने आपला अहं अल्प होतो’, हे लक्षात आले.’ – सौ. रीमा देशपांडे

२. अनुभूती

२ अ. ‘प्रवासात नामजप भावपूर्ण आणि एकाग्रतेने झाला. आश्रमाचा परिसर जवळ आल्यानंतर प्रसन्न वाटत होते.’ – सौ. रसिका जोशी 

२ आ. आश्रमात प्रवेश केल्यावर 

१. ‘देवद आश्रमात गेल्यावर ‘आपण वैकुंठात आलो आहोत’, असे वाटत होते.’ – सौ. सुरेखा तापकीर

२. ‘आश्रमात गेल्यावर चैतन्याच्या खाणीत गेल्यासारखे वाटले.’ – श्रीमती नीलम कुलकर्णी

३. ‘आश्रमात प्रवेश करतांना दैवी सुगंध आला, तसेच पदोपदी ईश्वराचे अस्तित्व जाणवून अंगावर रोमांच येत होते.’ – सौ. चारुता माहूरकर

४. ‘आश्रमाच्या भिंती शीतल जाणवल्या.’ – श्री. राहुल कुलकर्णी

२ इ. आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राच्या संदर्भात 

१. ‘सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचे छायाचित्र सजीव वाटत होते. त्यामध्ये चैतन्य जाणवत होते.’ – सौ. रीमा देशपांडे

२. ‘प.पू. बाबांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘ते आपल्याकडे पहात आहेत’, असे जाणवून भावजागृती झाली.’ – सौ. चारुता माहूरकर

३. ‘प.पू. बाबांच्या छायाचित्रासमोर प्रार्थना केल्यावर पुष्कळ ऊर्जा जाणवली आणि त्यामुळे मला मागे ढकलल्यासारखे झाले.’ – श्री. राहुल कुलकर्णी

२ ई. ध्यानमंदिर 

१. ‘ध्यानमंदिरात प.पू. बाबा आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांना भावपूर्ण प्रार्थना करतांना प.पू. बाबा माझ्याकडे हसून पहात असल्याचे जाणवले आणि आनंद झाला.’ – श्रीमती नीलम कुलकर्णी

२. ‘ध्यानमंदिरातील श्री गणेशाच्या ठिकाणी सुवर्ण गणेशमूर्तीचे दर्शन झाले.’ – सौ. वैशाली तापकीर

३. ‘ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना मनातील विचार नष्ट होऊन मन एकाग्र आणि उल्हसित झाले. शीतलता जाणवली आणि नामजप चांगला झाला.’ – श्री. अशोक आवारे आणि श्री. राहुल कुलकर्णी

४. ‘प.पू. बाबा आणि प.पू. पांडे महाराज यांच्या छायाचित्राजवळ नामजप करतांना एकाग्रता अन् चैतन्य अनुभवले.’- श्री. अशोक आवारे

२ उ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या वाहनाच्या संदर्भात 

१. ‘प.पू. बाबांच्या चारचाकी वाहनाजवळ गेल्यावर मला चैतन्य मिळाल्याचे जाणवले.’ – श्रीमती नीलम कुलकर्णी

२. ‘वाहनाला प्रदक्षिणा घालत असतांना पुष्कळ सात्त्विक स्पंदने जाणवली.’ – सौ. वैशाली तापकीर

३. ‘गाडीमध्ये बसून दत्ताचा नामजप करतांना ‘गाडी म्हणजे गुरुदेवांची खोलीच आहे’, असे वाटले आणि नामजप शांततेत होऊन १५ मिनिटांनी ध्यान लागले.’ – सौ. उषा पाटील

४. ‘येथे बसून नामजप करतांना ‘प.पू. बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे’, असे जाणवले.’ – सौ. शैलजा रसाळ

५. ‘येथे नामजप करतांना हलकेपणा जाणवला आणि मन शांत झाले.’ – सौ. रसिका जोशी

६. ‘वाहनावर हात ठेवल्यावर हाताला मुंग्या आल्या. गाडीजवळ बसून नामजप करतांना मनातील विचार आणि नकारात्मकता अल्प झाली. मनातल्या मनात आपोआप जयघोष होत होता.’

– श्री. राहुल कुलकर्णी

२ ऊ. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीच्या संदर्भात

१. ‘परात्पर गुरु पांडे महाराजांच्या खोलीत बसून नामजप करतांना पुष्कळ सात्त्विकता जाणवत होती. ‘चैतन्याच्या विविध आकाराच्या रेषा माझ्या दिशेने येत आहेत’, असे जाणवून पुष्कळ हलके वाटत होते.’ – सौ. वैशाली तापकीर

२. ‘परात्पर गुरु पांडे महाराजांच्या खोलीच्या बाहेर बसून नामजप करतांना मला पिवळा प्रकाश दिसला.’ – सौ. शैलजा रसाळ

३. ‘खोलीत बसून नामजप करतांना मला जांभया येत होत्या. त्यानंतर देह हलका झाल्याचे जाणवले.’ – सौ. चारुता माहूरकर

४. ‘खोलीमध्ये नामजप करतांना ‘गुरुदेव माझ्यासमोर बसलेले असून त्यांचा हात माझ्या मस्तकावर आहे’, असे १५ मिनिटे जाणवत होते.’ – सौ. रीमा देशपांडे

५. ‘खोलीत पुष्कळ शीतलता जाणवली.’ – श्री. राहुल कुलकर्णी

(२९.१०.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक