‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी’ प्रकल्पांमध्ये ४ कोटी रुपयांचा अपहार ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

धनंजय मुंडे, कृषीमंत्री

नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) – ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पां’तर्गत दिलेल्या कृषी अवजारांची सर्वसाधारण पडताळणी केली असता प्रत्यक्ष अवजारांच्या संख्येत तफावत आढळून आली. त्यामध्ये ४ कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. त्यानुसार संबंधित कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर दायित्व निश्चित करून ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे. त्यांचा खुलासा आल्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यावर निश्चित कारवाई करू, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेमध्ये सांगितले. यासंबंधी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.