काँग्रेसच्या काळात निवडणूक घोषित होण्यापूर्वी मुंबईतील आरे वसाहतीमधील श्रीराम मंदिराजवळील भूखंड कब्रस्थानासाठी हस्तांतरित !
आयुक्तस्तराच्या अधिकार्यांद्वारे चौकशीचे मंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन !
नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष २०१४ मध्ये राज्यात काँग्रेसचे सरकार असतांना विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरे वसाहत युनिट २० येथील श्रीराम मंदिराच्या जवळील अडीच सहस्र मीटर भूमी एका खासगी संस्थेला कब्रस्थानासाठी देण्यात आली. कब्रस्थानला हस्तांतरित करण्यासाठी चक्क या भूखंडाचे आरक्षण हटवण्यात आले, हा धक्कादायक प्रकार भाजपचे आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची आयुक्त पातळीच्या अधिकार्यांद्वारे चौकशी करण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात केली.
‘नोव्हेंबर २०१३ मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना तत्कालीन मंत्री नसीम खान यांच्या दबावाला बळी पडून ही जागा ‘अंजूमन तालिम उल् कुरान सुन्नी ताहा मज्जीद’ या खासगी संस्थेला ही जागा देण्यात आली. औद्योगिक विकास महामंडळ आणि महानगरपालिका यांच्याकडील हा भूखंड जिल्हाधिकार्यांकडे हस्तांतरित करण्यात आला. श्रीराम मंदिराच्या १ किलोमीटर अंतरावर आधीच कब्रस्थान आहे. असे असूनही हा भूखंड कब्रस्थानसाठी लांगूलचालनासाठी देण्यात आला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना या भूखंडावरील वैद्यकीय आरक्षण पालटण्यात आले. कार्यासाठी असलेले या भूमीचे आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना पालटण्यात आले. याविषयी जनतेचे मत मागवण्यात आले नाही’, असे आमदार योगेश सागर यांनी म्हटले.
‘लँड जिहाद’द्वारे हिंदूबहुल भूखंड बळकवण्याचा प्रयत्न ! – आमदार नीतेश राणे, भाजपमुंबईसह महाराष्ट्रात लँड जिहाद चालू आहे. हिंदूंची लोकसंख्या अल्प करण्याचे हे कटकारस्थान आहे. हिंदूंची लोकसंख्या अल्प करण्यासाठी हे प्रकार चालू आहेत. मुंबईतील हिंदूंच्या लोकसंख्येचे भूभाग अल्प होत आहेत. लव्ह जिहाद, उर्दू भवन, मदरसे उभारून हिंदूबहुल भूखंड बळकावण्याचा प्रकार चालू आहे. ‘लँड जिहाद’द्वारे मोक्याच्या जागा बळकावल्यात जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे अन्वेषण समयमर्यादेत पूर्ण करायला हवे. पुढील सुनावणीच्या वेळी याविषयीची वस्तूस्थिती न्यायालयापुढे मांडायला हवी, असे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले. यावर ‘चौकशी अहवाल न्यायालयाकडे सादर करण्यात येईल’, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. |