बहुतेक शीख खलिस्तानच्या मागणीचे समर्थन करत नाहीत ! – जस्सी सिंह, अमेरिकेतील शीख संघटनेचे नेते
अमेरिकेतील शीख संघटनेचे नेते जस्सी सिंह यांचा दावा !
वॉशिंग्टन (अमेरिका) – खलिस्तानच्या मागणीचे बहुतांश शीख समर्थन करत नाहीत. शीख भारतात आणि अमेरिकेतही अल्पंख्यांक आहेत. त्यांतील काही मोजके जण खलिस्तानचे समर्थन करत आहेत, असे विधान अमेरिकेतील ‘सिख ऑफ अमेरिका’ या संघटनेचे नेते जस्सी सिंह यांनी केले. जस्सी सिंह यांनी पंजाबमधील युवक अमली पदार्थांच्या व्यसनामध्ये अडकले आहेत. त्यांना यातून सोडवण्यासाठी, तसेच राज्यातील अन्य समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारने विकासासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी केली आहे.
जस्सी सिंह यांनी मोदी सरकारविषयी म्हटले की, शिखांच्या संदर्भात मागील सरकारांच्या तुलनेत मोदी सरकारने बरेच काही केले आहे. तरीही अजून काही सूत्रांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यात वर्ष १९८४ ची शीखविरोधी दंगल, हे एक सूत्र आहे.
संपादकीय भूमिकाअसे शीख जनतेसमोर येऊन खलिस्तानची मागणी करणार्यांना विरोध का करत नाहीत ? |