उत्तरप्रदेश शासनाप्रमाणेच महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी घालावी !
दर्यापूर (जिल्हा अमरावती) येथील धर्मप्रेमींचे शासनाला निवेदन
दर्यापूर (जिल्हा अमरावती) – उत्तरप्रदेश शासनाने हलाल उत्पादनांवर बंदी घातली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात ही बंदी घालून भारताच्या अर्थव्यवस्थेवरील महत्त्वाचे संकट दूर करण्यासाठी पावले उचलावीत, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावे स्थानिक तहसीलदारांना ‘हलालविरोधी कृती समिती’च्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.
खासदार डॉ. अनिल बोंडे यांनाही निवेदन
राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनाही भेटून याविषयी चर्चा करण्यात आली आणि निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी श्री. ओम राणे यांनी पुढाकार घेतला असून सर्वश्री कन्हैय्या मलिये, गौरव बैताडे, विनोद बिजवे, ज्योतीराम मोरे आणि अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.