मध्यप्रदेशात भोंग्यांनंतर आता उघड्यावर विनाअनुमती मांस विक्रीवर बंदी !
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी १३ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सायंकाळी राज्यातील धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी भोंगे लावण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला. आता त्यांनी राज्यात उघडण्यावर मांस विक्री करण्यावरही बंदी घालण्याचा दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये हे दोन्ही निर्णय घेतल्यानंतर आदेश देण्यात आला. या दोन्ही नियमांचे उल्लंघन करणार्यांना दंड आणि शिक्षा केली जाणार आहे.
न्यूज 18 एमपी छत्तीसगढ
भोंग्यांवरील बंदीविषयी सांगण्यात आले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीतच ध्वनीक्षेपक वापरण्याची अनुमती दिली जाणार आहे. याचा वापर धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठीच असेल. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई केली जाणार आहे. भोंग्यांसाठी अनुमती घ्यावी लागणार असून आवाजाची मर्यादाही निश्चित केलेली असेल.
संपादकीय भूमिकाआतापर्यंत असे का होत होते आणि प्रशासन त्याकडे दुर्लक्ष का करत होते ? याची चौकशी झाली पाहिजे ! |