Satara Rave Party : कासवंड (जिल्हा सातारा) येथील डॉक्टरांच्या ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांची धाड !
४ तरुणींसह ६ डॉक्टरांवर पोलिसांची कारवाई
(रेव्ह पार्टीमध्ये मध्य आणि अमली पदार्थ यांचे सेवन केले जाते)
सातारा, ६ डिसेंबर (वार्ता.) – पाचगणी येथील कासवंड गावातील स्प्रिंग रिसॉर्टवर पोलिसांनी धाड घातली. या वेळी सातारा जिल्ह्यातील ६ डॉक्टरांसह नाचणार्या ४ तरुणींना पोलिसांनी कह्यात घेतले. कासवंड गावात स्प्रिंग रिसॉर्टमध्ये जिल्ह्यातील डॉक्टरांची रेव्ह पार्टी चालू असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आचल दलाल यांना मिळाली. यानंतर विशेष पथक निर्माण करून कासवंड येथील स्प्रिंग रिसॉर्टवर रात्री १० वाजता धाड टाकण्यात आली. या वेळी मद्याच्या नशेत असलेल्या डॉक्टरांसमोर ४ तरुणी वेडेवाकडे अंगविक्षेप करत, अश्लील हावभाव करत नाचत असल्याचे आढळून आले. या पार्टीत जिल्ह्यातील ६ डॉक्टर, १ औषधनिर्मिती तज्ञ (फार्मासिस्ट), रिसॉर्ट चालक अशा ८ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकातरुण मुला-मुलींसह डॉक्टरांनाही रेव्ह पार्टी करणे, ही समाजाची नीतीमत्ता पूर्णपणे घसरल्याचे लक्षण ! |