आमदारांच्या सामूहिक छायाचित्रासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेळेत न आल्याने आमदार अप्रसन्न !
महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन २०२३
नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) : विधानसभेतील सर्वच पक्षांतील आमदार छायाचित्र काढण्यासाठी १४ डिसेंबर या दिवशी सकाळी १०.१५ वाजता विधानसभेच्या पायर्यांजवळ आले; परंतु मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येथे पोचले नाही. त्यानंतर हा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याने सर्वांनी अप्रसन्नता व्यक्त केली; परंतु शेवटी दुपारी १२ वाजता सामूहिक छायाचित्र काढले गेले.
विधानसभेतील सर्व आमदारांना सकाळी १०.५० वाजताची वेळ छायाचित्र काढण्यासाठी दिली होती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वेळेत न पोचल्याविषयी भास्कर जाधव, जयंत पाटील आणि सर्वच पक्षांचे आमदार यांनी विधानसभेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे अप्रसन्नता बोलून दाखवली.