Assam Action On Madarssas : आसाम सरकारने १ सहस्र २८१ मदरसे बंद करून चालू केल्या इंग्रजी शाळा !
गौहत्ती (आसाम) – आसाम सरकारच्या अनुदानातून चालवण्यात येणारे १ सहस्र २८१ मदरसे बंद करून तेथे आता इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडण्यात आल्या आहेत. येथे इस्लामऐवजी नेहमीसारखे सर्वांसाठीचे विषय शिकवले जाणार आहेत. राज्याचे शिक्षणमंत्री रनोज पेगू यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, सर्व सरकारी आणि प्रांतीय मदरशांना आता माध्यमिक शिक्षण शाळांमध्ये पालटण्यात आले आहे.
१. अशा प्रकारे बंद करण्यात आलेल्या मदरशांची बांगलादेशाला लागून असलेल्या धुबरी जिल्ह्यातील मदरशांची संख्या अधिक आहे. याखेरीज बारपेटा, नोगाँव, गोलपाडा आदी जिल्ह्यांतील मदरसेही बंद करण्यात आले आहेत. या जिल्ह्यांमध्ये बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात मुसलमान घुसखोरी करतात.
२. राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, ते राज्यातील सर्व मदरसे बंद करू इच्छित आहेत; कारण भारताला शाळा, महाविद्यालये आणि विश्वविद्यालये यांची आवश्यकता आहे. यांतूनच अभियंते, डॉक्टर आदी निर्माण होणार आहेत. मदरशांतून ते निर्माण होणार नाहीत.
(सौजन्य : The News)
संपादकीय भूमिका
|