अतिरेकी कारवायांत सहभागी असणार्या काँग्रेसच्या पदाधिकार्याच्या अन्वेषणाची विधानसभेत मागणी !
नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ठाणे जिल्ह्यातील पडघा-बोरीवली येथे धाडी टाकून १५ हून अधिक अतिरेक्यांना अटक केली. यामध्ये अटक करण्यात आलेला फारान्स हुसे हा उपसरपंच असून काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचा पदाधिकारी आहे. ‘या प्रकरणी अन्वेषण करावे’, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी १३ डिसेंबर या दिवशी माहितीच्या सूत्राच्या अंतर्गत उपस्थित केली.